Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ हा शो एका उंचीवर येऊन उभा आहे. ‘बिग बॉस’च्या घरात रोज होणारी नवनवीन भांडणे या शोची रंगत वाढवत आहे. या शोमधील चर्चेत असलेले स्पर्धक म्हणजे अंकिता लोखंडे व विकी जैन. अंकिता व विकी यांनी एकत्र या शोमध्ये एंट्री घेतली. शोमध्ये आल्यापासून हे कपल चर्चेत आलं आहे. दोघेही अनेकदा एकमेकांशी भांडताना दिसले. नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
विकी जैनने आयशा खानबरोबर केलेलं संभाषण त्याला महागात पडलं आहे. विकी व आयशाने गमतीत म्हटलेली एक गोष्ट अंकिताच्या पचनी पडली नाही. आयशा विकीला त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारते. यावर विकी म्हणतो की, ‘विवाहित पुरुषांना किती त्रास होतो हे ते कधीच मान्य करत नाहीत’. यावर आयशा म्हणते की, ती कधीही लग्न करणार नाही आणि वडिलांमुळे तिला कधीही लग्न करायचे नाही.
या संपूर्ण संभाषणानंतर अंकिता विकीला विचारते की, तो आयशाला असं का बोलला? तेव्हा विकी म्हणाला, “मला कसं वाटतंय हे मी कधीच सांगू शकत नाही. विवाहित लोक…विशेषतः पुरुषच या परिस्थितीतून जातात”. विकीच्या या उत्तरावर अंकिताचा पारा चढतो. तेव्हा अंकिता म्हणते, “तुला एवढा त्रास होत असेल तर तू माझ्याबरोबर का आहेस. घटस्फोट घे ना, मला तुझ्याबरोबर घरी परत जायचं नाही” असं ती रागात म्हणते. आणि तिथून निघून जाते.
आयशाशी पुढे बोलताना अंकिता म्हणते, “मला माहित आहे की विकी माझ्यावर प्रेम करतो पण मला त्याच्याकडून जे हवे आहे ते मला मिळत नाही. कधीकधी मला असे वाटते की तो माझ्यावर नियंत्रण वा वर्चस्व गाजवत आहे. मी पाहिले आहे की जेव्हाही मी पुरुष स्पर्धकाबरोबर भांडत असते, तो मला कसं थांबवतो?”. यापूर्वीही अंकिता व विकी जैनची अनेकदा भांडणं झाली आहेत. एकदा अंकिताने त्याला चप्पल फेकून मारली होती.