Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Haldi and Wedding : प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु होती. दोन दिवसांपासून मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळालं. त्यांनतर मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अखेर मुग्धा व प्रथमेश लग्नबंधनात अडकले आहेत. नुकताच त्यांच्या लग्नसोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमधील नववधू वराचा लूक लक्षवेधी ठरत आहे.
मुग्धा-प्रथमेशच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर आले आहेत. या फोटोंमधील दोघांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धाने लग्नसाठी नऊवारी साडी नेसलेली दिसतेय. तर प्रथमेशने पेशवाई लूक केलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान मुग्धा व प्रथमेशचा त्यांच्या लग्नसोहळ्यातील पारंपरिक लूक लक्षवेधी ठरत आहे. दोघांनी एकमेकांना हार घालतानाचा व्हिडीओ अगदी सुंदर आहे.
अगदी थाटामाटात केलेल्या मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नसोहळ्यात कलाक्षेत्रातीलही काही मंडळींनी हजेरी लावली होती. चिपळूण येथे दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं असल्याचं समोर आलं आहे. फुलांनीं, केळीच्या पानांनी सजलेल्या मंडपात मुग्धा-प्रथमेश अखेर बोहोल्यावर चढले आहेत. दोघांचा यांत पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला. प्रथमेश व मुग्धाच्या लग्नासाठी सजलेला मंडप व संपूर्ण थाटमाट आकर्षणाचा विषय ठरला.
‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो शेअर करत मुग्धा व प्रथमेशने त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर दोघांच्या साखरपुडा, व्याहीभोजनाचे फोटोही समोर आले. मुग्धा व प्रथमेश यांच्या हळदी व ग्रहमखच्या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनतर आता ही लोकप्रिय जोडी अखेर विवाहबंधनात अडकली आहे. लग्नाच्या समोर आलेल्या फोटोंवरून दोघंही आनंदी असल्याचं दिसत आहे.