शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : विकी जैनबरोबर अंकिता लोखंडे घटस्फोट घेणार, ‘बिग बॉस’च्या घरातच केला खुलासा, म्हणाली, “तुझ्याबरोबर परत मी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 21, 2023 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ankita lokhande and vicky jain

विकी जैनबरोबर अंकिता लोखंडे घटस्फोट घेणार, 'बिग बॉस'च्या घरातच केला खुलासा, म्हणाली, "तुझ्याबरोबर परत मी..."

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ हा शो एका उंचीवर येऊन उभा आहे. ‘बिग बॉस’च्या घरात रोज होणारी नवनवीन भांडणे या शोची रंगत वाढवत आहे. या शोमधील चर्चेत असलेले स्पर्धक म्हणजे अंकिता लोखंडे व विकी जैन. अंकिता व विकी यांनी एकत्र या शोमध्ये एंट्री घेतली. शोमध्ये आल्यापासून हे कपल चर्चेत आलं आहे. दोघेही अनेकदा एकमेकांशी भांडताना दिसले. नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.

विकी जैनने आयशा खानबरोबर केलेलं संभाषण त्याला महागात पडलं आहे. विकी व आयशाने गमतीत म्हटलेली एक गोष्ट अंकिताच्या पचनी पडली नाही. आयशा विकीला त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारते. यावर विकी म्हणतो की, ‘विवाहित पुरुषांना किती त्रास होतो हे ते कधीच मान्य करत नाहीत’. यावर आयशा म्हणते की, ती कधीही लग्न करणार नाही आणि वडिलांमुळे तिला कधीही लग्न करायचे नाही.

आणखी वाचा – “हल्ली लग्नाचे इव्हेंट केले जातात पण…”, जुई गडकरीला अशा पद्धतीने करायचं आहे लग्न, फेब्रुवारीमध्ये विवाहबंधनात अडकणार?

या संपूर्ण संभाषणानंतर अंकिता विकीला विचारते की, तो आयशाला असं का बोलला? तेव्हा विकी म्हणाला, “मला कसं वाटतंय हे मी कधीच सांगू शकत नाही. विवाहित लोक…विशेषतः पुरुषच या परिस्थितीतून जातात”. विकीच्या या उत्तरावर अंकिताचा पारा चढतो. तेव्हा अंकिता म्हणते, “तुला एवढा त्रास होत असेल तर तू माझ्याबरोबर का आहेस. घटस्फोट घे ना, मला तुझ्याबरोबर घरी परत जायचं नाही” असं ती रागात म्हणते. आणि तिथून निघून जाते.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – “मोठ्या सिनेमांचा दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि…”, ‘झिम्मा २’वरुन सिद्धार्थ चांदेकरने केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “आमचा प्रयत्न…”

आयशाशी पुढे बोलताना अंकिता म्हणते, “मला माहित आहे की विकी माझ्यावर प्रेम करतो पण मला त्याच्याकडून जे हवे आहे ते मला मिळत नाही. कधीकधी मला असे वाटते की तो माझ्यावर नियंत्रण वा वर्चस्व गाजवत आहे. मी पाहिले आहे की जेव्हाही मी पुरुष स्पर्धकाबरोबर भांडत असते, तो मला कसं थांबवतो?”. यापूर्वीही अंकिता व विकी जैनची अनेकदा भांडणं झाली आहेत. एकदा अंकिताने त्याला चप्पल फेकून मारली होती.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jain divorceayesha khanbigg boss 17vicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Haldi and Wedding

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate : शुभमंगल सावधान! प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनचा थाटामाटात विवाहसोहळा संपन्न, मंडपातील व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.