Bigg Boss Updates : गेले काही दिवस ‘बिग बॉस’ एका कारणावरुन चांगलाच चर्चेत आला आहे आणि ते कारण म्हणजे नुकतेच या घरात विकी व अंकिताची आईची एण्ट्री. नुकतेच ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता व विकीच्या आईने हजेरी लावली होती. यावेळी अंकिताने विकीला चप्पल फेकून मारल्यामुळे सासूने अंकिताला तुझे वडिलही आईला असेच मारत होते का? असं विचारलं होतं आणि यामुळे विकीच्या आईबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.
अंकिताने विकीला चप्पल फेकून मारली होती. तेव्हा विकीच्या वडिलांनी अंकिताच्या आईला फोन केला होता. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि ज्यामध्ये ती विक्की जैनसोबत त्याच्या आई-वडिलांबद्दल खूप बोलत आहे. शोमध्ये जेव्हा विकी आणि अंकिताचे भांडण झाले आणि चप्पल फेकल्याची घटना घडली तेव्हा विकीच्या वडिलांनी अंकिताच्या आईला फोन करून “तीसुद्धा आपल्या पतीसोबत असे वागते का?” असे विचारले होते.
Vicky's father did not only said "aap apne pati ko bhi aise marti thi kya" but also "aapki aukat kya hai" and many more harsh things to a woman who just lost her husband.
— ???????????????? ???? (@lomlrubi) January 14, 2024
This is cruelty and absurdity. I'm so irritated with Vicky's family drama !!#AnkitaLokhande #BiggBoss17 pic.twitter.com/G6VY3MHcV2
यावर अंकिताने विकीला असे म्हटले की, “माझ्या आईला पपा (विकीचे वडील) यांनी बोलावले होते. तेव्हा ते तिला असे म्हणाले की, “तुम्हीसुद्धा तुमच्या पतीला चप्पल फेकून अशाप्रकारे मारहाण केली होती का?” तसेच यापुढे पप्पांनी “तुमची औकात आहे का?” असंही माझ्या आईला म्हटले होते. यापुढे अंकिता असं म्हणाली की, “मी खूप नम्रपणे आईला (विक्कीची आई) सांगितले की, ती एकटी आहे, माझ्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. मी विकीबरोबर असं वागल्यानंतर मला खूपच वाईट वाटले. जे काही झाले त्यात माझीच चूक आहे. माझ्या आई-वडिलांचा यात काहीच भाग नाही.”
हेही वाचा – ‘या’ दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘द इंडियन पोलिस फोर्स’ व ‘एक्स्ट्रा ऑर्डीनरी मॅन’, पाहा संपूर्ण यादी
या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यावर एकाने असे म्हटलं की, “तुमची औकात काय आहे? हे दुसऱ्या कुणाचे विधान नसून स्वत: अंकिताने हे म्हटले होते.” तर दुसऱ्याने विकीच्या विरोधात कमेंट करत असे म्हटले आहे की, “विकीने त्याच्या वडिलांच्या वर्तणूकीबद्दल अंकिताची क्षमा मागण्याऐवजी तिला तुझे वडिल काय बोलले असते?” असं विचारत आहे. यावरुन त्याचे कुटुंब काय मानसिकतेचे आहे हे कळून येते. तर आणखी एकाने “विकीचे कुटुंब हे एक पैसेवाले व खूप गर्विष्ठ कुटुंब आहे” असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.