मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीने शेअर केली नवऱ्याची हळवी बाजू, खास व्हिडीओ केला पोस्ट, लेकींचा चेहराही आला समोर अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 15, 2024 | 6:01 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress kranti redkar shared special video of her husband on occasion of marriage anniversary see the details

Video : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीने शेअर केली नवऱ्याची हळवी बाजू, खास व्हिडीओ केला पोस्ट, लेकींचा चेहराही आला समोर अन्...

सध्या सोशल मीडिया हेदेखील एक मनोरंजनाचे साधन झाले आहे आणि या सोशल मीडियाचा वापर करत अनेकजण त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. मराठीतील अनेक कलाकार या सोशल मीडियावर त्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात, यांपैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर. क्रांतीच्या लेकींच्या अनेक करामती ती सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील उत्तम प्रतिसाद मिळत असतो. (Kranti Redkar On Instagram)

अशातच क्रांतीने नुकताच एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा नवीन व्हिडीओ क्रांती किंवा तिच्या लेकींचा नसून समीर वानखेडे यांचा आहे. क्रांतीने शेअर केलेल्या या नवीन व्हिडीओमध्ये पती समीर वानखेडे हे त्यांच्या लेकींची काळजी करताना व त्यांच्याबरोबर काही खास क्षण घालवताना दिसत आहे. क्रांतीने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हा खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओखाली तिने पती समीर वानखेडे यांचं कौतुक करणारे छान कॅप्शनदेखील लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

हेही वाचा – Bigg Boss 17 : “तुमची औकात आहे का?”, अंकिताने विकीजवळ केली त्याच्या आई-वडिलांची तक्रार, नेटकरी म्हणाले “खूप गर्विष्ठ कुटुंब…”

हा व्हिडीओ शेअर क्रांतीने कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “प्रिय समीर, देवाने तुला माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल मी त्याची आभारी आहे. आतापर्यंत पाहिलेला सर्वात शूर माणूस तू आहेस. मी तुला सर्व  वादळांचा सामना करताना पाहिले आहे, ज्यात तु अजिबात डगमगला नाहीस. आजवर तू शांत राहिला आहेस. तू निधड्या छातीने सर्व आव्हांनाचा सामना केला आहेस. त्यामुळे तुझे फक्त नी फक्त चांगलंच होईल. कारण नशीब हे केवळ शूर व सत्यवादी लोकांसाठी अनुकूल असतं, त्यामुळेच तुम्ही केवळ लढाईच नाही, तर मोठं युद्धदेखील जिंकाल. सुवर्ण भारताचे स्वप्न तुम्ही एक दिवस पूर्ण कराल आणि त्या दिवशी मी आनंदाने, अभिमानाने तुमच्या बाजूला उभी असेन.” 

हेही वाचा – चित्त थरारक दृश्ये, शहारे अन्…; दीपिका-हृतिकच्या ‘फायटर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “ब्लॉकबस्टर…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “छबिल व गोडो (क्रांतीच्या मुली) तुमच्याकडून खूप काही शिकत आहेत आणि माझ्या दोन्ही लेकी योग्य मूल्यांसह देशसेवेसाठी सज्ज होत आहेत. इतके व्यस्त असूनही तुम्ही मला अचूक १२ वाजता शुभेच्छा दिल्यात आणि याच छोट्या छोट्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.” दरम्यान, या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली क्रांती व समीर यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

Tags: समीर वानखेडेमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी बातमीक्रांती रेडकरentertainment newskranti redkarmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsSameer Wankhede
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Piyush Ranade and Suruchi Adarkar Makarsankrant

यंदाची संक्रांत पियुष रानडेसाठी आहे खूप खास, स्वतःच खुलासा करत म्हणाला, "या दिवशी आम्ही दोघेही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.