गेल्या वर्षंभरात ओटीटीच्या प्रेक्षकांना ओटीटीच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर मनोरंजक चित्रपट व वेबसीरिज पाहायला मिळाले आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझोन प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी त्यांच्या चाहत्यांसाठी खास मनोरंजनाची मेजवाणी उपलब्ध करुन दिली असून आगामी काही दिवसांतदेखील ओटीटीवर चाहत्यांना यांचे आवडते अॅक्शनपट व रोमान्सने भरलेले काही चित्रपट व सीरिज पाहता येणार आहेत. तर जाऊन घेऊयात त्यांची तपशीलवार माहिती.
(१) एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन : या चित्रपटात अभि नावाची व्यक्ती आहे. ज्याला लहानपणापासून अभिनयाची आवड आहे आणि तो जेव्हा मोठा होतो, तेव्हा तो एक कनिष्ठ कलाकार बनतो. पण जेव्हा तो एका कंपनीच्या एमडी लिकिथाच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याच्या रील आणि रिअल जीवनाला एक विचित्र वळण मिळते. अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात नितीन, रोहिणी, श्री लीला, राव रमेश, सुदेव नायर आणि राजशेखर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपट येत्या १९ जानेवारी रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
(२) इंडियन पोलिस फोर्स : रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सीरिजमधून दिल्लीच्या कबीर मलिकबरोबर पहिल्यांदाच एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे पात्रही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अभिनेत्री शिल्पा शेट्टीने साकारली आहे. तिच्याबरोबर विवेक ओबेरॉय, श्वेता तिवारी सिद्धार्थ मल्होत्रा हे कलाकारही या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही वेबसीरिज येत्या १९ जानेवारी रोजी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
(३) जो : हरिहरन राम एस दिग्दर्शित ‘जो’ या चित्रपटात भव्य त्रिखा आणि मालविका मनोज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवरदेखील प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या १५ जानेवारी रोजी रोमांस व ड्रामा असलेला हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.