रविवार, जून 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 18, 2026 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kadambari Mali Interview

"१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी", लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, "फुकट काम…"

Kadambari Mali Interview : कलाकार म्हटलं की त्यांना सिनेसृष्टीत येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असे बरेच कलाकार आहेत ज्यांचा कोणीही वारसाहक्क नसताना त्यांनी स्वमेहनतीच्या जोरावर आपली जागा निर्माण केली. यादरम्यान बऱ्याच कलाकारांना वय, उंची, वजन, रुप या गोष्टींचा सामना करावा लागतो. भूमिकेसाठी त्यांना बरीच तडजोड करावी लागते. पण यावरही मात करत त्या स्वतःची जागा निर्माण करतात. या अशा अडचणींवर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नुकत्याच केलेल्या मुलाखतीतील भाष्य साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. लीडच्या भूमिका न मिळणं, पेमेंटसाठी वाट पाहणं या अशा गंभीर समस्यांवर ‘पाऊस २’ वेबसीरिज फेम अभिनेत्री कादंबरी माळीने भाष्य केलं आहे.

कादंबरीने नुकतीच ‘इट्स मज्जा मराठी’च्या ‘रोल, कॅमेरा, गप्पा’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी बोलताना कादंबरी म्हणाली, “नायिका निवड करताना नायिकेचं जे वय आहे. त्या वयाचा हट्ट फार वेळेला आडवा येतो असं वाटतं. कदाचित मग काय काम करू शकते समोरची मुलगी किंवा काय नाही काम करू शकत. काम कसं आहे हे एक चाळायला नाही लागत कधी कधी. नाही नाही आम्हाला सोळा वर्षीचीच मुलगी लीड म्हणून पाहिजे सतरा वर्षीचीच मुलगी लीड म्हणून पाहिजे. कदाचित ते दिसतही असेल. त्यांच्या दृष्टीने काही प्रमाणात ते बरोबर ही असेल की Age दिसतं. हे दिसतं ते दिसतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सेफ्टी. सकाळी जाताना काही नाही वाटत. सेटवरची सेफ्टी. येतानाची. त्यासाठी मला वाटतं आता मुलींनीच खंबीर व्हायला पाहिजे. ही जबाबदारी घेतली पाहिजे आता कोणावर अवलंबून न राहता हे आपण केलं पाहिजे. आपलं आउटपुट देताना काही अडथळे येत असतील तर मला वाटतं ते प्रत्येक कलाकाराने ओव्हरकम केलं पाहिजे”.

आणखी वाचा – मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

पुढे तिने म्हटलं, “Pay Well म्हणण्यापेक्षा आता Pay On Time अशी म्हणायची परिस्थिती आली आहे. मी मागे जे काम केलं त्याचे पैसे मला अजूनही मिळालेले नाहीत. आणि आता मी नवीन काम घेतलंय. त्या कामाचे पैसे सुद्धा तीन महिन्यांनी मिळतात. म्हणजे बघ मी एक वर्ष फुकट काम करते. म्हणजे हे जेव्हा Survival Mode वर येणार आहे की आता कसं उभं राहायचं. existence पर्यंत गोष्टी पोहोचेपर्यंत नका वाट बघू. कसं करणार समोरचा माणूस Survive. तिथपर्यंत नका Push करू लिमिट्स . स्वतःचे पण आणि कलाकाराचे पण. मान्य आहे सगळ्या गोष्टी असतात. आर्थिक गणितं असतात. टीआरपी असतो. ज्या वाहिनीवर या गोष्टी होत असतात. त्यांची गणितं असतात”.

आणखी वाचा – आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

शेवटी कादंबरी म्हणाली, “तुमच्या प्रोडक्शन लेव्हलपर्यंत बऱ्याच गोष्टी असतात. पण मला असं वाटतं की मग आर्टिस्टचेच का पैसे थांबवायचे. असं खूप कमी वेळा झालंय की आर्टिस्ट व्यतिरिक्त पैसे अडवले आहेत. मग असं असेल की अमाऊंट जास्त आहे. मग सुरुवातीलाच जास्त पर डे घेणाऱ्या माणसाला नका घेऊ. किंवा सुरुवातीलाच तुम्हाला असं वाटतंय की हा कलाकार आर्थिक दृष्ट्या मला परवडणार नाही. मग नका विचार करू”.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
how sleep can impact heart health

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.