गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जन्माला आल्यानंतर राधा सागरच्या मुलाचा मोठ्या आजाराशी सामना, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “श्वास घ्यायला त्रास झाला अन्…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 13, 2023 | 5:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Radha Sagar On her Son

जन्माला आल्यानंतर राधा सागरच्या मुलाचा मोठ्या आजाराशी सामना, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "श्वास घ्यायला त्रास झाला अन्…"

अभिनेत्री राधा सागर ही तिच्या खलनायिकांच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेली आहे. राधाने सध्या मालिकाविश्वातून ब्रेक घेतला आहे. कारण सध्या राधा तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. राधाने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला असून तिच्या बाळाची पहिली झलक तिने चाहत्यांनाही दाखवली आहे. (Radha Sagar On her Son)

काही महिन्यांपूर्वी राधाने तिच्या वाढदिवशी आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. त्यानंतर अभिनेत्रीचं गरोदरपणात केलेलं फोटोशूट आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरलं होता. राधाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली असून अगदी शाही थाटामाटात तिच्या बाळाचं बारसं पार पडलं. पारंपरिक लूक करून अभिनेत्रींच्या कुटुंबीयांनी या सोहळ्याची खास रंगत वाढविली. अभिनेत्रीने तिच्या बाळाचं नाव वीर असं ठेवलं आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’मध्ये येण्यापूर्वी अंकिता लोखंडे-विकी जैनमध्ये मोठा वाद, बायकोला सोडूनही गेला अन्…; अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “१ वर्षासाठी तो…”

राधाने तिच्या लेकाचं नाव वीर का ठेवलं आहे याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. राधाने ‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती, ‘आम्ही त्याच्या जन्माच्या आधीपासूनच खूप खुश होतो. तो जन्माला आला तेव्हाही आम्ही प्रचंड आनंदी झालो. पण त्याचा जन्म झाला आणि ताबडतोब त्याला एनआयसीयुमध्ये नेण्यात आलं कारण त्याला जन्मापासून श्वास घ्यायला त्रास होत होता. तो जवळपास ९- १० दिवस तिथे होता” असं म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध पुरस्काराने केतकी माटेगावकरचा सन्मान, गायिकेचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “पुरस्कार स्वीकारताना…”

पुढे ती म्हणाली, “आम्ही खूप काळजीत पडलो. तेव्हा त्याची चिंता वाटायला लागली. तो तिथून बाहेर केव्हा येतोय याची आम्ही वाट पाहू लागलो. आणि शेवटी तो आमच्याकडे परत आलाच. जन्मापासूनच तो लढवैय्या आहे. त्यामुळे मला वाटलं की, त्याच्यासाठी वीर हे नावचं योग्य आहे. तो शूरवीर आहे. जन्माला आल्यानंतर त्याने मोठ्या आजाराचा सामना केला” असंही म्हणाली.

Tags: marathi actressradha sagarradha sagar babyradha sagar on her sonradha sagar son name ceremony
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
marathi actor bharat jadhav shared special video of his mother and father on his birthday

कोल्हापूरमध्ये बंगला, शेती अन्…; आई-वडिलांची अशी सेवा करायचे भरत जाधव, जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणाले, "उशिरा येऊनही माझे पाय दाबायचा अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.