‘बिग बॉस १७’ हे नवीन पर्व आल्यापासूनच चर्चेत आहे. घरात रोजच नवीन नवीन राडे घडताना पाहायला मिळतात. घरातील स्पर्धक कोणत्याही कारणावरून एकमेकांशी वाद घालताना दिसतात. त्याचबरोबर शोमधील प्रत्येक स्पर्धक घरात टिकून राहण्यासाठी त्यांचा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. अशातच नुकत्याच झालेल्या एका भागात नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. यात अंकिता लोखंडे, सना रईस खान, अरुण, जिग्ना व्होरा व सनी आर्या यांना नॉमिनेट करण्यात आले.
‘बिग बॉस’ने नॉमिनेशन प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेत ‘बिग बॉस’ने सर्व स्पर्धकांची नावे झाडावर लावली. मग प्रत्येक स्पर्धकाला झाडाखाली जाऊन बसायचे होते. तेव्हा एका स्पर्धकाचे नाव चमकणार होते. त्यानंतर झाडाखाली बसलेल्या स्पर्धकाला इतर स्पर्धकांना नॉमिनेट करायचं, की सुरक्षित ठेवायचं याचा निर्णय द्यायचा होता. अरुणपासून ही प्रक्रिया सुरू होते आणि अरुणच्या वेळी जेव्हा जिग्नाचे नाव चमकते तेव्हा अरुण तिला नॉमिनेट करतो. हे ऐकून जिग्ना दु:खी होते. तेव्हा ईशा तिथे येते आणि काय झालं असं विचारते. त्यावर ऐश्वर्या असं म्हणते की, “जिग्नाने अरुणचे अंतर्वस्त्र धुतले आहेत तरीदेखील अरुणने तिला नॉमिनेट केले.”
तेव्हा मन्नारा मध्येच “तसं काही बोलू नकोस” असं म्हणते. यावर ऐश्वर्या तिला लगेच असे उत्तर देते की, “का बोलू नको? त्यांना लाज वाटली पाहिजे. जिग्नाने अरूणचे सगळे कपडे धुतले आहेत. तरीदेखील अरुणने तिला नॉमिनेट केले. मी तर नीलचे अंतरवस्त्रे कधीच धुत नाही आणि यापुढे कधीही धुणार नाही.” तिच्या या उत्तरावर नीलदेखील हसायला लागतो.
दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात रोज होणाऱ्या भांडणांमुळे व बिग बॉस’च्या रोजच्या नवीन टास्कमुळे हा शो दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. त्याचबरोबर या शोच्या आगामी भागात कोण येणार? आणि कोण जाणार? यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत.