अभिनेता प्रसाद ओक व त्याची पत्नी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. प्रसाद त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या पत्नीबरोबरच्या रील व्हिडीओमुळे चर्चेत असतात. साधा प्रसाद व त्याची पत्नी एका विशेष कारणामुळे चर्चेत आले आहेत. प्रसाद त्याच्या कुटुंबाबरोबर परदेश दौरा करत असल्याचं समोर आलं आहे. प्रसाद त्याची पत्नी मंजिरी व लेक मयांकसह जर्मनीला फिरायला गेला आहे. (Manjiri Oak Answers To Trollers)
केवळ फिरण्यासाठीच नव्हे तर ओक कुटुंबाचं नाव मोठं करणाऱ्या एका सोहळयाला या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. प्रसादचा एक मुलगा सार्थक शिक्षणानिमित्त परदेशात असून नुकताच त्याचा पदवी प्रदान सोहळा पार पडला. लेकाच्या या सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी ते गेले होते. सार्थकने ‘बीए इन इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट’ यामध्ये पदवी मिळवली आहे. त्याच्या या पदवी प्रदान सोहळ्याचा अभिमानाचा क्षण प्रसाद व मंजिरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
प्रसादने लेकाचा हा पदवी प्रदान सोहळ्याचा सन्मान त्याच्या कॅमेऱ्यात कैद करत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला होता. यावेळी त्याने कॅप्शन देत म्हटलं की, सार्थकचा ‘पदवी प्रदान समारंभ’ सार्थक. आम्हा सगळ्यांपासून खूप लांब राहून शिक्षण घ्यायचा निर्णय तू अत्यंत धाडसाने घेतलास. खूप कष्ट केलेस. खूप अभ्यास केला. आज हे क्षण पाहताना तुझ्या निर्णयाचं व कष्टांचं चीज झालं असं मनापासून वाटतंय. तुझ्या पुढच्या प्रवासाला अगणित शुभेच्छा”. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकार मंडळींनी कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, त्यांच्या या पोस्टवरील नेटकऱ्यांच्या काही कमेंट लक्षवेधी ठरत आहेत. कारण नेटकऱ्यांनी प्रसाद- मंजिरीच्या लेकाच्या शिक्षणावरून त्यांना ट्रोल केलं असल्याचं समोर आलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “भारतातले सगळे श्रीमंत लोक उच्च शिक्षणासाठी परदेशात का जातात? भारतात विकास का करत नाहीत?” असं म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने यावर कमेंट करत, “दुसऱ्या देशात जाती जमाती नाही आहेत का? तिथे देखील मागासलेले लोकं असतीलचं” असं म्हटलं आहे. या नेटकऱ्याच्या कमेंटवर मंजिरीने उत्तर देत नेटकऱ्याची बोलती बंद केली आहे. मंजिरीने कमेंट करत, “आमच्या आनंदात तुम्हाला सहभागी व्हायचं नसेल तर कृपया आम्हाला अनफॉलो करा. पण कोणतातरी भलताच विषय काढून नजर लावू नका आणि समाजात नकारात्मकता पसरवू नका” असं म्हणत ट्रोलर्सला खडेबोल सुनावले आहेत.