शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आमच्या आत्मनिर्भरतेवर गदा…”, मालदीव विरुद्ध लक्षद्वीप वादात बिग बी अमिताभ बच्चन यांचीही उडी, पोस्ट शेअर करत म्हणाले, “आम्ही भारत…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 8, 2024 | 3:38 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
big b amitabh bachchan shared post on Lakshadweep vs maldives clash actor said we are india and we are aatmanirbhar

आमच्या आत्मनिर्भरतेवर गदा...”, मालदीव विरुद्ध लक्षद्वीप वादात बिग बी अमिताभ बच्चन यांचीही उडी, पोस्ट शेअर करत म्हणाले, “आम्ही भारत...”

सोशल मीडियावर सध्या लक्षद्वीप विरुद्ध मालदीव या विषयावरून जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या भेटीबद्दल एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट केली होती. त्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी टीका केली आणि केंद्रशासित प्रदेशाला मालदीवचे पर्यायी पर्यटन स्थळ करण्याचा हा प्रयत्न होता, असं म्हटलं होतं. त्यानंतर सगळा वाद सुरू झाला आहे. यावर अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट करत लक्षद्वीप पर्यटनाचं कौतुक केलं आहे. अशातच बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लक्षद्वीप विरुद्ध मालदीव यावर त्यांचे मत मांडले आहे. (Amitabh bachchan On X (Twitter))

माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी एक पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, “उडुपीचे सुंदर समुद्रकिनारे, पॉंडीमधील पॅराडाईज बीच, अंदमानमधील नील व हॅवलॉक बीच वा आपल्या देशभरात इतर अनेक सुंदर समुद्रकिनारे व काही अशी अनेक ठिकाणे आहेत जी पायाभूत सुविधांच्या मदतीने आणखी सुंदर करता येऊ शकतात. मालदीवच्या मंत्र्यांनी आपल्या देशाबद्दल आणि आपल्या पंतप्रधानांबद्दल केलेले विधान हे आपण भारतातील ही ठिकाणं पर्यटकांसाठी आकर्षक बनवण्यासाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक उत्तम संधी आहे.” त्यांच्याच या पोस्टला अमिताभ बच्चन यांनी समर्थन दिले आहे.

Viru paji .. this is so relevant and in the right spirit of our land .. our own are the very best .. I have been to Lakshadweep and Andamans and they are such astonishingly beautiful locations .. stunning waters beaches and the underwater experience is simply unbelievable ..
हम… https://t.co/NM400eJAbm

— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 8, 2024

आणखी वाचा – हिऱ्यांचा वापर, युनिक डिझाइन अन्…; अमृता देशमुखचं मंगळसूत्र आहे फारच खास, सोशल मीडियावर रंगली चर्चा

विरेंद्र सेहवाग यांच्या पोस्टला समर्थन देत अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “विरू पाजी… हे खूपच समर्पक आहे आणि आपल्याच भूमीच्या भावनेशी अगदी अनुरूप आहे. मी लक्षद्वीप आणि अंदमानला गेलो आहे आणि ती अतिशय अप्रतिम व सुंदर ठिकाणं आहेत. सुंदर समुद्रकिनारे आणि खोल पाण्यातील अनुभव तर अविश्वसनीय आहेत. आम्ही भारत आहोत, आम्ही आत्मनिर्भर आहोत, आमच्या आत्मनिर्भरतेवर गदा आणू नका, जय हिंद.”

आणखी वाचा – “अचानक गाडीमधून उतरले अन्…”, खालापूर टोलनाक्यावर राज ठाकरेंनी नेमकं काय केलं?, सिद्धार्थ जाधवने सांगितला संपूर्ण प्रकार

दरम्यान, नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली. मात्र, तिथल्या राजकीय नेत्यांनी त्यांची खिल्ली उडवली आणि त्यामुळे हा वाद निर्माण झाला. अशातच रणवीर सिंग, श्रद्धा कपूर, वरुण धवन, सलमान खान, अक्षय कुमार, कंगना रणौत, जॉन अब्राहम, जान्हवी कपूर, सारा अली खान, शिल्पा शेट्टी, उर्वशी रौतेला यांसारख्या कलाकार मंडळी लक्षद्वीप पर्यटनाला पाठिंबा देत आहे.

Tags: amitabh bachchanBollywood entertainmentbollywood newsentertainment newsLakshadweep vs Maldivespolitical news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Salman Khan Farmhouse

सलमान खानच्या फार्महाऊसवर दोन अनोळखी व्यक्तींकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न, तारेचं कुंपन तोडलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.