सोशल मीडियावर सध्या लक्षद्वीप विरुद्ध मालदीव या विषयावरून जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या भेटीबद्दल एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट केली होती. त्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी टीका केली आणि केंद्रशासित प्रदेशाला मालदीवचे पर्यायी पर्यटन स्थळ करण्याचा हा प्रयत्न होता, असं म्हटलं होतं. त्यानंतर सगळा वाद सुरू झाला आहे. यावर अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट करत लक्षद्वीप पर्यटनाचं कौतुक केलं आहे. अशातच बिग बी अमिताभ बच्चन यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लक्षद्वीप विरुद्ध मालदीव यावर त्यांचे मत मांडले आहे. (Amitabh bachchan On X (Twitter))
माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी एक पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, “उडुपीचे सुंदर समुद्रकिनारे, पॉंडीमधील पॅराडाईज बीच, अंदमानमधील नील व हॅवलॉक बीच वा आपल्या देशभरात इतर अनेक सुंदर समुद्रकिनारे व काही अशी अनेक ठिकाणे आहेत जी पायाभूत सुविधांच्या मदतीने आणखी सुंदर करता येऊ शकतात. मालदीवच्या मंत्र्यांनी आपल्या देशाबद्दल आणि आपल्या पंतप्रधानांबद्दल केलेले विधान हे आपण भारतातील ही ठिकाणं पर्यटकांसाठी आकर्षक बनवण्यासाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एक उत्तम संधी आहे.” त्यांच्याच या पोस्टला अमिताभ बच्चन यांनी समर्थन दिले आहे.
Viru paji .. this is so relevant and in the right spirit of our land .. our own are the very best .. I have been to Lakshadweep and Andamans and they are such astonishingly beautiful locations .. stunning waters beaches and the underwater experience is simply unbelievable ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 8, 2024
हम… https://t.co/NM400eJAbm
आणखी वाचा – हिऱ्यांचा वापर, युनिक डिझाइन अन्…; अमृता देशमुखचं मंगळसूत्र आहे फारच खास, सोशल मीडियावर रंगली चर्चा
विरेंद्र सेहवाग यांच्या पोस्टला समर्थन देत अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “विरू पाजी… हे खूपच समर्पक आहे आणि आपल्याच भूमीच्या भावनेशी अगदी अनुरूप आहे. मी लक्षद्वीप आणि अंदमानला गेलो आहे आणि ती अतिशय अप्रतिम व सुंदर ठिकाणं आहेत. सुंदर समुद्रकिनारे आणि खोल पाण्यातील अनुभव तर अविश्वसनीय आहेत. आम्ही भारत आहोत, आम्ही आत्मनिर्भर आहोत, आमच्या आत्मनिर्भरतेवर गदा आणू नका, जय हिंद.”
दरम्यान, नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली. मात्र, तिथल्या राजकीय नेत्यांनी त्यांची खिल्ली उडवली आणि त्यामुळे हा वाद निर्माण झाला. अशातच रणवीर सिंग, श्रद्धा कपूर, वरुण धवन, सलमान खान, अक्षय कुमार, कंगना रणौत, जॉन अब्राहम, जान्हवी कपूर, सारा अली खान, शिल्पा शेट्टी, उर्वशी रौतेला यांसारख्या कलाकार मंडळी लक्षद्वीप पर्यटनाला पाठिंबा देत आहे.