२०२३ सरुन आता २०२४ या नवीन वर्षाची नांदी झाली आहे. २०२३ हे वर्ष सरले असले तरी हे वर्ष विविध कारणांसाठी चर्चेत राहिलं. सिनेसृष्टीसाठी तर हे वर्ष अधिकच खास होतं. गेल्या वर्षात काही कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधत चाहत्यांसह गुडन्यूज शेअर केली. यंदाच्या वर्षी एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळाले. अशातच अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे यांच्या लग्नाची फार चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळाले. (Amruta Deshmukh On Instagram)
अमृता व प्रसाद जवादे ही जोडी काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. अमृता-प्रसादच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला. ‘बिग बॉस’ मराठीमुळे ही जोडी विशेष चर्चेत आली. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम फुलत गेलं. अखेर सोशल मीडियावरुन त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. प्रसाद-अमृताच्या लग्नाला काही दिवस पूर्ण झाले असून अमृताने सोशल मीडियाव शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तिच्या मंगळसुत्राची चांगलीच चर्चा सुरु आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाचा सुंदर नक्षीकाम असलेला ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा क्युट अंदाज पाहायला मिळत आहे. दरम्यान अमृताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्या गळ्यातील मंगळसूत्राने चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. अमृताचे मंगळसूत्र हे खास डिझाईन असलेलं आहे. अभिनेत्रीच्या मंगळसूत्रामधील दोन वाट्या या छान अशा डायमंड्स (हिऱ्यांनी) भरलेल्या आहेत. त्याचबरोबर मंगळसुत्रात काळ्या मण्यांनादेखील तितकेच महत्त्वाचे स्थान दिले असल्याचे पाहायला मिळत आहे. अमृताचे हे सुंदर मंगळसूत्र पेंडंटसारखे असल्याचेही दिसत आहे.
दरम्यान, अमृताने शेअर केलेलेल्या व्हिडीओमधून पहिल्यांदाच तिच्या मंगळसूत्राची झलक पाहायला मिळत आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच या व्हिडीओखाली “खूपच सुंदर, खूपच भारी, अतिशय निरागस आणि क्युट दिसत आहेस, क्या बात है” अशा अनेक कमेंट्सद्वारे अमृताचे व तिच्या गळ्यातील आकर्षक मंगळसूत्राचे कौतुक केले आहे.