कलर्स वहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेने गेले अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. बाळूमामांचे भक्त महाराष्ट्रभर असल्याने त्यांच्या आयुष्यावर आधारित हे कथानक प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले. गेली ५ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत असताना मालिकेत नुकताच एक मोठा बदल झाला आहे. बाळूमामांची भूमिका सकारणारा अभिनेता सुमित पुसावळेने ही मालिका सोडली असून बाळूमामांच्या भूमिकेसाठी त्याच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे.
अभिनेता सुमित पुसावळे लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरो घरी मातीच्या चुली’ या मालिकेत झळकणार आहे. सुमितने या मालिकेतून निरोप घेतल्यानंतर आता त्याच्याजागी कोणता अभिनेता बाळूमामांची भूमिका साकारणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. अशातच कलर्स मराठीने एका खास व्हिडीओद्वारे सुमितच्या जागी कोणता अभिनेता दिसेल हे जाहीर केले आहे. वाहिनीने बाळूमामांच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाचा प्रोमो शेअर करत या नव्या अभिनेत्याच्या नावाची घोषणा केली आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये अभिचे वडील अप्पा जहागिरदार ही भूमिका साकारणारे अभिनेते अभिनेते प्रकाश धोत्रे हे बाळूमामांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी याआधीही विविध मालिकांमध्ये काम करत अभिनयाची छाप सोडली आहे. अशातच आता ते बाळूमामांच्या नव्या भूमिकेसाठीही सज्ज झाले आहेत. त्यामुळे त्यांचे अनेक चाहतेमंडळी या नवीन भूमिकेसाठी चांगलेच आतुर आहेत.
या नवीन व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चंहत्यानी लाईक्स व कमेंट्सद्वारे उत्सूकता दाखवली आहे. तसेच बाळूमामांच्या अनेक भक्तमंडळींनीही “बाळूमामांच्या नावानं चांगभलं, जय श्री बाळूमामा, जय बाळूमामा” अशा कमेंट करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, त्यांच्याआधी ‘बाळूमामा’ ही भूमिका साकारणारा सुमित लवकरच रेश्मा शिंदेसह ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे त्यांचे चाहतेही या नवीन मालिकेसाठी व त्यांच्या भूमिकेसाठी आतुर आहेत.