शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मधील बाळूमामांची भूमिका साकारणाऱ्या सुमित पुसावळेने सोडली मालिका, आता नव्या कलाकाराची एन्ट्री

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 4, 2024 | 12:16 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Balumamachya navane changbhal serial new lead actor’s entry promo out

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'मधील बाळूमामांची भूमिका साकारणाऱ्या सुमित पुसावळेने सोडली मालिका, आता नव्या कलाकाराची एन्ट्री

कलर्स वहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेने गेले अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. बाळूमामांचे भक्त महाराष्ट्रभर असल्याने त्यांच्या आयुष्यावर आधारित हे कथानक प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले. गेली ५ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत असताना मालिकेत नुकताच एक मोठा बदल झाला आहे. बाळूमामांची भूमिका सकारणारा अभिनेता सुमित पुसावळेने ही मालिका सोडली असून बाळूमामांच्या भूमिकेसाठी त्याच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे.

अभिनेता सुमित पुसावळे लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरो घरी मातीच्या चुली’ या मालिकेत झळकणार आहे. सुमितने या मालिकेतून निरोप घेतल्यानंतर आता त्याच्याजागी कोणता अभिनेता बाळूमामांची भूमिका साकारणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. अशातच कलर्स मराठीने एका खास व्हिडीओद्वारे सुमितच्या जागी कोणता अभिनेता दिसेल हे जाहीर केले आहे. वाहिनीने बाळूमामांच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाचा प्रोमो शेअर करत या नव्या अभिनेत्याच्या नावाची घोषणा केली आहे. 

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

आणखी वाचा – Video : करीना कपूरचा लेक भलताच खट्याळ, जीभ काढून कॅमेऱ्यामॅनलाच चिडवून दाखवलं, आई हात धरुन खेचू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये अभिचे वडील अप्पा जहागिरदार ही भूमिका साकारणारे अभिनेते अभिनेते प्रकाश धोत्रे हे बाळूमामांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी याआधीही विविध मालिकांमध्ये काम करत अभिनयाची छाप सोडली आहे. अशातच आता ते बाळूमामांच्या नव्या भूमिकेसाठीही सज्ज झाले आहेत. त्यामुळे त्यांचे अनेक चाहतेमंडळी या नवीन भूमिकेसाठी चांगलेच आतुर आहेत.

आणखी वाचा – कानपूरच्या वैभव गुप्ताने पटकावलं ‘इंडियन आयडल १४’चे विजेतेपद, आकर्षक ट्रॉफीसह मिळाले तब्बल इतके रुपये, अलिशान कार अन्…

या नवीन व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चंहत्यानी लाईक्स व कमेंट्सद्वारे उत्सूकता दाखवली आहे. तसेच बाळूमामांच्या अनेक भक्तमंडळींनीही “बाळूमामांच्या नावानं चांगभलं, जय श्री बाळूमामा, जय बाळूमामा” अशा कमेंट करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, त्यांच्याआधी ‘बाळूमामा’ ही भूमिका साकारणारा सुमित लवकरच रेश्मा शिंदेसह ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे त्यांचे चाहतेही या नवीन मालिकेसाठी व त्यांच्या भूमिकेसाठी आतुर आहेत.  

Tags: मनोरंजन बातमीमराठी मनोरंजन बातमीमराठी मालिकामराठी मालिका बातमीमालिका बातमीबाळूमामाच्या नावानं चांगभलंBalumamachya navane changbhalentertainment newsmarathi entertainment newsmarathi serialMarathi Serial Newsserial news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

Video : अंबानींच्या कार्यक्रमात सूनेसह जया बच्चन यांची एन्ट्री, मागून मागून चालत राहिल्या अन्…; 'त्या' कृतीमुळे रंगली चर्चा कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.