मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अंबानींच्या कार्यक्रमात सूनेसह जया बच्चन यांची एन्ट्री, मागून मागून चालत राहिल्या अन्…; ‘त्या’ कृतीमुळे रंगली चर्चा कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 4, 2024 | 12:24 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

Video : अंबानींच्या कार्यक्रमात सूनेसह जया बच्चन यांची एन्ट्री, मागून मागून चालत राहिल्या अन्...; 'त्या' कृतीमुळे रंगली चर्चा कारण...

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar : गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नाआधीचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला. संपूर्ण देशभरात या कार्यक्रमाची धूम बघायला मिळाली. यासाठी जगभरातील अनेक उद्योगपतींनी हजेरी लावली होती. हॉलिवूड पॉपस्टार रिहानानेही कोट्यावधी रुपयांचे मानधन घेत जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला. रिहानाच्या परफॉर्मन्सचे व्हिडीओ अजूनही सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. या कार्यक्रमासाठी बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शवली. सर्वांनी विविध परफॉर्मन्सही सादर केले.खान मंडळींचा एकत्रित डान्स, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने अभिनेत्रींबरोबर केलेला डान्स तसेच रणवीर सिंह व दीपिकाचा जबरदस्त परफॉर्मन्स या सर्वांनीच उपस्थितांची मने जिंकली.

अनंत व राधिका यांच्या 1 ते 3 मार्च दरम्यान पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होतं. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण घरी परतत असताना ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  

आणखी वाचा – Video : करीना कपूरचा लेक भलताच खट्याळ, जीभ काढून कॅमेऱ्यामॅनलाच चिडवून दाखवलं, आई हात धरुन खेचू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सदर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बच्चन कुटुंबीय जामनगर एअरपोर्टसाठी रवाना होत असताना अमिताभ,अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या व जया ही सर्व एकत्र निघाले होते. पण त्या नंतर एकट्या चालू लागल्या. त्यावेळी फोटोग्राफर्सना बघून जया यांनी स्मितहास्य केलं आणि अभिवादन करुन निघून गेल्या. नेहमी फोटोग्राफर्सवर चिडणाऱ्या, फटकारणाऱ्या जया यांनी स्मितहास्य कसं काय दिलं? यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडीओवर एक नेटकरी म्हणाला की, “अरे! यांना काय झालं?”, दूसरा नेटकरी लिहितो की, “पहिल्यांदाच त्यांना मी हसताना पाहिलं आहे”, तिसरा नेटकरी म्हणाला की, “आज या ओरडल्या नाहीत”.

आणखी वाचा – Video : ऐश्वर्या राय बच्चनच्या लेकीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच चक्रावले, हुबेहुब आईसारखी दिसत आहे आराध्या बच्चन, इतका झाला आहे बदल

जया यांच्याबरोबरच त्यांची नात आराध्याच्या हेअरस्टाइलनेही सर्वांचे लक्ष वेधले. इतक्या वर्षांपासून एकसारख्या हेअरस्टाइलमध्ये राहणाऱ्या आराध्याची वेगळी हेअरस्टाइल बघायला मिळाली.काही महिन्यांपूर्वीच आराध्याने तिच्या शाळेतील एका कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये तिच्या अभिनयाची झलखही पाहायला मिळाली होती. तिच्या अभिनयाचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले. तसेच अभिनयाचा वारसा आराध्या पुढे चालवेल असेही अनेकांनी म्हटले.    

Tags: Anant Ambani Wedding News in MarathiAnant Ambani-Radhika Merchant Pre Wedding FunctionsAnant Ambani-Radhika Merchant Wedding Date in MarathiAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding bashAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding JamnagarAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding Marathi NewsJamnagar Airportradhika merchantRihannaRihanna in Anant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Rinku Rajguru Angry

जळगावमध्ये कार्यक्रमासाठी गेल्यानंतर रिंकू राजगुरुला धक्काबुक्की, कॅमेऱ्यासमोरच भडकली अभिनेत्री, म्हणाली, "याजागी तुमची मुलगी असती तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.