Indian Idol 14 Winner : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध सिंगिंग शो ‘इंडियन आयडल’चे १४ वे विशेष गाजले, काही दिवसांपूर्वी आलेल्या या शोने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. या शोमधील प्रत्येक स्पर्धकांनी त्यांच्या गायनशैलीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. अशातच नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला असून या कानपूरच्या गायक वैभव गुप्ताने ‘इंडियन आयडल १४’च्या विजेतेपदाचा किताब जिंकला आहे. या शोमधील वैभव गुप्ता, सुभदीप दास, आद्य मिश्रा, अंजना पद्मनाभन, पीयूष पनवार व अनन्या पाल या एकूण ६ अंतिम स्पर्धकांपैकी वैभव गुप्ताने ‘इंडियन आयडल १४’ची ट्रॉफी जिंकली आहे.
‘इंडियन आयडल १४’च्या गायन स्पर्धेत वैभव गुप्ता हा विजेता ठरला. त्याला या विजेतेपदासह एक आकर्षक ट्रॉफी व बक्षीस म्हणून रोख रक्कम २५ लाख रुपये मिळाले आहेत. इतकंच नाही तर, त्याला एक आलिशान कारही भेट म्हणून मिळाली आहे. तर शोचा उपविजेता सुभदीप दास ठरला, ज्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तर द्वितीय उपविजेत्या पियुष पनवारला ट्रॉफीसह ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. याशिवाय अनन्या पाल ही तिसरी उपविजेती ठरली असून, तिला बक्षीस म्हणून तीन लाख रुपयांचा धनादेश मिळाला आहे.
आणखी वाचा – ‘अच्छा तो हम चलते है’, धर्मेंद्र यांच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
‘इंडियन आयडल १४’च्या ६ अंतिम स्पर्धकांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळाली. पण, वैभवने सर्वांना पराभूत करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. ‘इंडियन आयडल १४’चा महाअंतिम सोहळा हा खूपच प्रेक्षणीय होता. तसेच या महाअंतिम सोहळ्यात खास पाहुणा म्हणून आलेल्या गायक सोनू निगम यांनी महाअंतिम सोहळ्याची शोभा आणखी वाढवली. त्याच्या व गायिका श्रेया घोषालच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले.
आणखी वाचा – अखेर लग्नबंधनात अडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदना, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर
कुमार सानू, श्रेया घोषाल यांनी व विशाल ददलानी या मातब्बर गायकांनी ‘इंडियन आयडल १४’च्या परीक्षक पदाची धुरा सांभाळली. तर ‘इंडियन आयडल १४’च्या महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता हुसैन कुवाजेरवालाने केले. दरम्यान, विजेतेपदाची ट्रॉफी जिंकताच वैभवने आपला आनंद व्यक्त करत असं म्हटलं की, “माझा खरंच यावर विश्वास बसत नाहीये की, मी हा शो जिंकला आहे. त्यामुळे देशभरातील लोकांचे मन:पूर्वक धन्यवाद”.