गेले काही दिवस सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. यानिमित्ताने १ ते ३ मार्चपर्यंत या प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात आले होते. अशातच नुकतीच काल (३ मार्च) रोजी या भव्य कार्यक्रमाची सांगता झाली. त्यामुळे सगळे कलाकार आपली घराकडे कूच करत आहेत.
अशातच सोशल मीडियावर करीना कपूर व सैफ अली खान यांचा मुलगा जेहचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेहच्या चेहऱ्यावर आगळेवेगळे भाव असल्याचे दिसत आहे. करीना कपूर त्याचा हात पकडून त्याला घेऊन जाण्याच्या प्रयत्न करताना दिसत आहे, मात्र जेहला अतियहुन जायचे नसल्याचे या व्हिडीओवरुण कळत आहे. त्यामुळे जेहचा हा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
या व्हिडीओखाली एकाने असं म्हटलं आहे की, “जेह म्हणत असेल ही यांची रोजची काय नाटकं आहेत” तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “जेह खरोखरच वैतागला आहे वाटतं”. तसेच अनेकांनी “इन्स्टाग्राम सुरु करताच जामनगरला पोहोचलो असं वाटतं आहे. आम्ही अंबानी अॅप् डाउनलोड केलं आहे की काय असं वाटत आहे. काहीही म्हणा जेह खूपच क्युट आहे. शेवटी एकदाचे हे कार्यक्रम संपले.” अशा भन्नाट कमेंट्स करत या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – ‘अच्छा तो हम चलते है’, धर्मेंद्र यांच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
दरम्यान, १ तारखेपासून ३ तारखेपर्यंत चाललेल्या या भव्य कार्यक्रमात बॉलिवूड, हॉलिवूड, राजकीय, कला तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. करीना व सैफने दिलजीत दोसांझबरोबर स्टेजवर सादरीकरण केले, तर शाहरुख, सलमान व आमिर खान यांनीही या कार्यक्रमात नाटू नाटू या गाण्यावर चांगलाच ठेका धरला.