ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे नुकतेच दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टी हळहळली असून अनेक कलाकार त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे. अभिनेते अशोक सराफ यांनी रवींद्र महाजनी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना आम्ही एक चांगला व देखणा नट गमावल्याचं दुःख व्यक्त केलं आहे. (ashok saraf on ravindra mahajani passed away)
काय म्हणाले अशोक मामा ? (ashok saraf on ravindra mahajani passed away)
अभिनेते अशोक सराफ हे ‘टीव्ही ९’ वाहिनीशी बोलताना म्हणाले, “खूप वाईट घडलंय. आमच्या पिढीतला एकमेव देखणा नट गेला, असं मला वाटतं. तो हिरो आणि मी साईडला असे बरेच चित्रपट आम्ही एकत्र केलेत. आम्ही यशस्वी चित्रपट केले आहेत. एक चांगला माणूस, एक चांगला मित्र गेल्याने खूप दुःख होतंय. माझा मित्र तर गेलाच पण सोबतच एक चांगला नट गमावल्याचं दुःख मनात कायम राहील. नेहमी हसत खेळत वावरणारा, हसमुख चेहऱ्याचा नट होता. प्रामाणिकपणा हा त्याच्यातला सर्वात मोठा गुण होता, तो प्रत्येक भूमिका उत्तम करायचा. जे करायचा ते मन लावून करायचा, त्यामुळे तो त्या काळातला एक यशस्वी नट होता.”
हे देखील वाचा : मुलगा स्टार असूनही रवींद्र राहायचे भाड्याच्या घरात? चाहत्यांच्या प्रश्नांना उधाण
रवींद्र महाजनी हे मराठी सिनेसृष्टीतील हॅण्डसम हिरो म्हणून ओळखले जायचे. रवींद्र यांनी मुंबईचा फौजदार, झूंज, आराम हराम आहे, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ, कॅरी ऑन मराठा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेलं असून त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा देखील अभिनेता आहे. रवींद्र महाजनींची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती. त्यांच्या अकाली निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (ravindra mahajani passed away)