मराठी सिनेसृष्टीतील चॉकोलेट बॉय म्हणजे अभिनेता अजिंक्य राऊत.त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी अजिंक्यला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.मन उडू उडू झालं या मालिकेने अजिंक्यला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.मालिकेने प्रेक्षकांचं निरोप जरी घेतला असला तरी ऋता आणि अजिंक्यची जोडीला अजूनही प्रेक्षकांच्या मनात स्थान आहे.(ajinkya raut new serial)
आता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता नवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. अबोल प्रीतीची अजब कहाणी या सोनी मराठी वरील नवीन मालिकेत राजवीर या भूमिकेत अजिंक्य पाहायला मिळणार आहे. तसेच अभिनेत्री जान्हवी ताबंट आणि अजिंक्य राऊत ही फ्रेश जोडी प्रेक्षांच्या भेटीला येत आहे. वेगळी कथा. फ्रेश जोडी ही या मालिकेची जमेची बाजू आहे. मालीकेच्या प्रोमोलाच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
शूटिंगदरम्यान अजिंक्यची तब्बेत खालावली (ajinkya raut new serial)
१७ जुलैपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचं शूट, प्रमोशन अगदी जोरदार सुरु आहे. मालिकेचे चित्रीकरण नियमितपणे सुरु आहेच. त्याव्यतिरिक्त मालिकेच्या प्रमोशन्स साठी देखील तो तितक्याच उत्सुकतेने फिरताना दिसत आहे. दररोज मालिकेचे चित्रकरण सुरु असताना अजिंक्यची तब्येत थोडी खालावली. पण प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येण्याच्या उत्सहात तोच ते सगळं विसरलाय. मालिकेच्या सेटवरच तो डॉक्टरांना बोलावून तिथेच त्याचा उपचार तो करत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याची फार काळजी असून सोशल मीडिया वर त्यांनी त्यांचे अजिंक्यावरील प्रेम व्यक्त केले. अजिंक्यची तब्बेत लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी ते त्याला सदिच्छा देत आहेत.(ajinkya raut new serial)
अजिंक्यने देखील त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट करून तो कशी स्वतःची काळजी घेतो आहे आणि तोच सतत कसे काम करतो आहे आणि सोनी मराठी वाहिनी आणि निर्मिती संस्था आणि तो स्वतःची काळजी कसा घेत आहे याबद्दल त्याने सांगितलं.शो मस्ट गो ऑन म्हणत अजिंक्यने ही पोस्ट शेअर केली आहे, तसेच अनेक कलाकारांनी देखील कमेंट्स करून काळजी व्यक्त केलेली पाहायला मिळते आहे.