शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बसा तरी म्हणायचं होतं”, पाया पडला भाऊ कदम, पण अशोक मामांनी दिलेली वागणूक पाहून भडकले चाहते, म्हणाले, “मोठा माणूस…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 5, 2023 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bhau kadam ashok saraf video

“बसा तरी म्हणायचं होतं”, पाया पडला भाऊ कदम, पण अशोक मामांनी दिलेली वागणूक पाहून भडकले चाहते, म्हणाले, “मोठा माणूस...”

‘चला हवा येऊ द्या’ म्हटलं की, डोळ्यासमोर भाऊ कदमचं नाव उभं राहतं. या कार्यक्रमामधून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात भाऊ यशस्वी ठरला. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्याचे चाहते आहेत. मराठीसह बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांकडून भाऊला शाबासकीची थाप मिळाली. मराठीतील सुप्रसिद्ध कलाकारांच्या यादीमध्ये आता त्याचाही समावेश झाला आहे. फक्त कलाकार म्हणूनच नव्हे तर व्यक्ती म्हणूनही भाऊ तितकाच उत्तम आहे. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व भाऊची झालेली भेट.

अशोक सराफ यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. शिवाय अशोक मामांना एकदा तरी भेटावं अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. भाऊची हिच इच्छा पूर्ण झाली. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अशोक मामा आले असताना भाऊ व त्यांची भेट झाली. पण त्यानंतरही या दोघांची झालेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – Video: प्रार्थना बेहरने सोडली मुंबई, ‘या’ ठिकाणी बांधलं आलिशान घर, तिथेच स्थायिक झाली अभिनेत्री, म्हणाली, “मुंबई सोडून…”

भाऊने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भाऊ अशोक मामांना भेटायला आलेला दिसत आहे. अशोक मामांना पाहताच भाऊ त्यांच्या पाया पडतो. अशोक मामा सोफ्यावर बसून त्याची विचारपूस करतात. तर भाऊ त्यांच्या समोर अगदी नम्रपणे उभा असलेला दिसत आहे. अशोक मामांनी विचारपूस करुन झाल्यावर तिथून निघताना भाऊ पुन्हा एकदा त्यांच्या पाया पडतो.

आणखी वाचा – Video : क्रांती रेडकरने पहिल्यांदाच दाखवली तिच्या जुळ्या मुलींची झलक, व्हिडिओ पाहून सेलिब्रिटीही करत आहेत कौतुक

View this post on Instagram

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

हा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना दोन कलाकारांना एकत्र पाहिल्याचा आनंद झाला. शिवाय भाऊच्या चेहऱ्यावरही अशोक मामांना भेटल्याचा आनंद आहे. पण या व्हिडीओनंतर अशोक मामांबाबत काहींनी नकारात्मक कमेंट केल्या आहेत. इथे बस असंही म्हणाले नाहीत मग हा कसला मोठा माणूस, भाऊ ये बस, चहा-कॉफी घेणार की नाही असंही विचारलं नाही, पाहुणचार केला नाही असं कुठे असतं का? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अशोक मामा भाऊशी जे वागलं ते नेटकऱ्यांना पटलं नसल्याचं यामधून दिसून आलं.

Tags: ashok sarafbhau kadammarathi actormarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Ketaki Chitale Facebook Post

"रुग्णालयाच्या डीनला संडास साफ…", नांदेडमधील 'त्या' घटनेवरुन केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट, म्हणाली, "जात बघून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.