रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रुग्णालयाच्या डीनला संडास साफ…”, नांदेडमधील ‘त्या’ घटनेवरुन केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट, म्हणाली, “जात बघून…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 5, 2023 | 7:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ketaki Chitale Facebook Post

नांदेडमधील 'त्या' घटनेवरुन केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

नांदेड येथील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सध्या तेथील मृतांच्या संख्येमुळे चर्चेत आहे. रुग्णालयात मागील २४ तासांत १२ नवजात बालकांसह तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत असून घटनेनंतर या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे. दरम्यान, या प्रकारानंतर खासदार हेमंत पाटील यांनी या रुग्णालयाच्या अधिष्ठातांना शौचालय साफ करण्यास लावल्याची घटना घडली. या घटनेवरही अनेक प्रतिक्रिया येत आहे. अशातच अभिनेत्री केतकी चितळेने या घटनेवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली. (Ketaki Chitale Facebook Post)

मराठी अभिनेत्री केतकी चितळे सध्या अभिनयक्षेत्रात सक्रिय नसली, तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र, तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती अडचणीत सापडली असून एकदा तिला तुरुंगातदेखील जावं लागलं आहे. असं असूनदेखील ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर बेधडक वक्तव्ये करत असते. आता तिने फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट शेअर करत या घटनेचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केलं आहे.

हे देखील वाचा – ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत शिवानी सोनारची एन्ट्री, सिंधुताईंच्या भूमिकेत दिसणार, प्रोमो समोर

शेअर केलेल्या या पोस्टमध्ये केतकी म्हणते, “एका रुग्णालयाच्या डीनला आता रुग्णालयामधील संडास साफ करा, हे त्याची जात बघून सांगायचे तर! आणि तरीही आपल्याकडे खोट्या ॲट्रॉसिटीच्या केसेस टाकल्या जात नाहीत. जय हो ॲट्रॉसिटी कायदा. आम्ही सामान्य माणासांवर काय, तर आता कुठल्या पदालाही नाही सोडणार.” तिच्या या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे. शिवाय, काहींनी तिच्या या पोस्टवर टीकादेखील केली आहे. केतकीने ‘तुझं माझं ब्रेकअप’ आणि ‘आंबट गोड’ मालिकेत काम केलं आहे. त्याचबरोबर तिने हिंदी मालिकांमध्येसुद्धा काम केलेलं आहे.

Tags: facebook postketaki chitaleKetaki Chitale Facebook Post
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Gurmeet Choudhary gives CPR and save a person

Video : बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीचा गुरमीत चौधरीने वाचवला जीव, व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.