रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दुसऱ्यांदा प्रेम करणं चुकीचं नाही”, ५७व्या वर्षी बाबा होणार असल्याचं जाहिर करताच अरबाज खानचं वक्तव्य, म्हणाला, “चिंतेत राहण्यापेक्षा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 11, 2025 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Arbaaz khan on love life

“दुसऱ्यांदा प्रेम करणं चुकीचं नाही”, ५७व्या वर्षी बाबा होणार असल्याचं जाहिर करताच अरबाज खानचं वक्तव्य, म्हणाला, “चिंतेत राहण्यापेक्षा...”

अरबाज खान हे नाव सध्या बी-टाऊनमध्ये अधिक चर्चेचा विषय ठरलं आहे. बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळेच तो टॉक ऑफ द टाऊन ठरतो. २०२३मध्ये त्याने शूरासह लग्न केलं. मलायका अरोराबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर त्याचं हे दुसरं लग्न आहे. विशेष म्हणजे २० वर्षांनी लहान शूराबरोबर त्याने संसार थाटला. गेल्या काही दिवसांपासून शूरा गरोदर असल्याच्या विविध चर्चा रंगत आहेत. कॅमेऱ्यासमोरही तिचं वाढलेलं पोट दिसलं. आता याच चर्चांवर अरबाजने शिक्कामोर्तब केला आहे. ५७व्या वर्षी अरबाज बाबा होणार असल्याचं त्याने अखेरीस जाहिर केलं. त्याचबरोबरीने दुसऱ्यांदा प्रेम करणं हा काही गुन्हा नाही असं अरबाजचं म्हणणं आहे. (Arbaaz khan on love life)

इटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने अनेक खुलासे केले. पुन्हा प्रेम होतं का? याबाबत अरबाज बोलला. तो म्हणाला, “तुम्ही जर एकदा प्रेमात पडलात तर तुम्ही दुसऱ्यांदाही प्रेम करुच शकता. कारण तुमच्या मनातच प्रेम असतं. ते तुम्ही समोरच्या व्यक्तीवर व्यक्त करु शकता. एकदा तुम्हाला प्रेम झालं तर तुम्ही पुन्हा कधीच प्रेम करु शकत नाही या मताचा मी नाही. असं का असलं पाहिजे?. पुढे तुमचं सगळं आयुष्य आहे”.

आणखी वाचा – “खूप वर्षांनी बाबा होतोय, चिंता आहे पण…”, पहिल्यांदाच दुसऱ्या बायकोच्या प्रेग्नंसीबाबत बोलला अरबाज खान, ५७व्या वर्षी बाबा होणार

View this post on Instagram

A post shared by Telly Creates (@tellycreates)

“सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं. आणि ती निघून गेल्यानंतर पुढचं आयुष्य फक्त एका आशेवर जगत राहणार. असं फक्त चिंतेत राहण्यात अर्थ आहे का?. तुम्ही जगण्याची आशा ठेवली पाहिजे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर जर वाट्याला प्रेम आलं तर त्यामध्ये खूश असलं पाहिजे. एका व्यक्तीकडूनच तुम्हाला प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण असं होत नसेल आणि दुसरी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर त्याचं स्वागत करा”.

आणखी वाचा – “माझं लग्न झालं म्हणून…”, बॉलिवूडमध्ये फारसं काम न मिळण्यावरुन पहिल्यांदाच बोलली जिनिलीया देशमुख, म्हणाली, “मानसिकता…”

“कोणत्याही व्यक्तीवर प्रेम करणं अपराध नाही. चुकीचं काम करणं, व्यक्तीचा राग करणं ही मोठी समस्या आहे. कोणावर प्रेम करणं ही समस्या नसली पाहिजे. प्रेमात पडण्यासाठी एक काय तर दुसरी संधीही प्रत्येकाला मिळायला हवी. दुसऱ्यांदा प्रेम होणं यामध्ये चुकीचं काहीच नाही”. अरबाजने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये त्याच्या मते प्रेम म्हणजे काय? हे सांगितलं.

Tags: arbaaz khanbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Jui Gadkari Health

‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला झाली कावीळ, पाणी उकळून पिण्याचा दिला सल्ला, कावीळवरील रामबाण उपाय आहेत तरी काय…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.