शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खूप वर्षांनी बाबा होतोय, चिंता आहे पण…”, पहिल्यांदाच दुसऱ्या बायकोच्या प्रेग्नंसीबाबत बोलला अरबाज खान, ५७व्या वर्षी बाबा होणार

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 11, 2025 | 1:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
arbaaz khan on sshura pregnancy

“खूप वर्षांनी बाबा होतोय, चिंता आहे पण...”, पहिल्यांदाच दुसऱ्या बायकोच्या प्रेग्नंसीबाबत बोलला अरबाज खान, ५७व्या वर्षी बाबा होणार

बॉलिवूडच्या बहुचर्चित कुटुंबापैकी सलमान खानचं कुटुंब नेहमीच प्रकाशझोतात राहिलं आहे. खान कुटुंबियांनी सुपरस्टार, सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. सलमानसह त्याच्या भावांचंही खासगी आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरलं. एकीकडे सलमानने लग्न केलं नाही, त्याच्या गर्लफ्रेंड्स याविषयी चर्चा रंगते. तर दुसरीकडे त्याचा भाऊ अरबाज खानच्या नात्याविषयी नव्या गोष्टी समोर येतात. मलायका अरोराबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजने त्याचा जोडीदार निवडला. २०२३मध्ये त्याने २२ वर्षांनी लहान शूराबरोबर गुपचूप लग्न केलं. आता लग्नाच्या दोन वर्षांनी शूरा गरोदर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याचबाबत अरबाजचा सुरु झाल्या आहेत. याचबाबत काने आता पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केलं आहे. (arbaaz khan on sshura pregnancy)

गेल्या काही दिवसांपासून शूराचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ व फोटोंमध्ये तिचे बेबी बंप दिसत आहे. मात्र अरबाज किंवा शूराने याबाबत काहीही बोलणं टाळलं होतं. मध्यंतरी स्त्रीरोग तज्ज्ञच्या रुग्णालयाबाहेर अरबाज व शूरा दिसले. त्यानंतर या चर्चांना जोरदार उधाण आलं. आता तर शूराला पाहूनच ती गरोदर असल्याचं अनेक जण सोशल मीडियाद्वारे बोलत आहेत. याचविषयी अरबाजने स्पष्ट सांगितलं.

आणखी वाचा – “माझं लग्न झालं म्हणून…”, बॉलिवूडमध्ये फारसं काम न मिळण्यावरुन पहिल्यांदाच बोलली जिनिलीया देशमुख, म्हणाली, “मानसिकता…”

View this post on Instagram

A post shared by Telly Creates (@tellycreates)

वयाच्या ५७व्या वर्षी अरबाज पुन्हा बाबा होणार आहे. ईटाइम्सशी संवाद साधताना अरबाज म्हणाला, “हो ती गरोदर आहे. मी आता हे नाकारु शकत नाही. कारण सगळेच याबाबत आता चर्चा करत आहेत. माझं कुटुंबालाही याबाबत माहिती आहे. लोकांनाही याबाबत आता माहिती झालं आहे. आणि ही चांगलीच गोष्ट आहे. तिच्याकडे पाहून सगळं चित्र आता स्पष्ट दिसतं. आमच्या दोघांच्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर क्षण आहे. आम्ही खूप खुश आहोत आणि पुढील वाटचालीसाठी उत्सुक आहोत. नव्या आयुष्याचं आम्ही आनंदाने स्वागत करत आहोत”.

आणखी वाचा – लग्नाच्या आठ वर्षांनी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले इशिता दत्ता व वत्सल शेठ, दाखवली लेकीची झलक, अभिनेत्री म्हणाली, “आमचं कुटुंब…”

आयुष्यातील हा महत्त्वपूर्ण वेळ असताना तुझ्या भावना काय आहेत? असा प्रश्नही अरबाजला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “अशावेळी सगळेच चिंतेत असतात. प्रत्येत माणसाला चिंता वाटतेच. मीही खूप वर्षांनी बाबा होणार आहे. माझ्यासाठीही हा नवा आणि आनंदाचा क्षण आहे. मी खूप जास्त उत्साही आहे. मी खूश आहे आणि नव्या जबाबदारीची मला आता जाणीव होत आहे”. मुलाचा सांभाळ करण्याबाबत अरबाज म्हणाला, “मला फक्त त्याच्यासाठी आदर्श वडील व्हायचं आहे. जे आपल्या मुलाच्या कायम बरोबर असतात, त्याची काळजी घेतात, प्रेम करतात तेच उत्तम पालक असतात. मलाही अगदी तसंच पालक व्हायचं आहे”. अरबाजने पहिल्यांदाच त्याच्या मनातील भावना बोलून दाखवल्या.

Tags: arbaaz khanbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Dhanashri Kadgaonkar Video

"कधी वेळ मिळालाच नाही", लग्नाच्या ११ वर्षात पहिल्यांदाच 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीने साजरी केली वटपौर्णिमा, म्हणाली, "सात फेरे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.