बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अनुष्का शर्मा व विराट कोहली?, लवकरच घरी नव्या पाहुण्याचं आगमन

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 30, 2023 | 5:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
anushka shrama second baby

दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अनुष्का शर्मा व विराट कोहली?, लवकरच घरी नव्या पाहुण्याचं आगमन

अनुष्का शर्मा व विराह कोहली या सुपरहिट कपलचे लाखो चाहते आहेत. या सेलिब्रिटी कपलकडे पाहिलं की, त्यांचा अगदी हेवा वाटतो. दोघांना आता दोन वर्षांची मुलगी आहे. वामिका असं अनुष्का व विराटच्या मुलीचं नाव आहे. आई झाल्यानंतर अनुष्का तर तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे. अधिकाधिक वेळ मुलीला देताना ती दिसते. कलाक्षेत्रापासूनही अनुष्का सध्या दूर आहे. आता अनुष्का व विराटबाबत एक नवी चर्चा सुरु झाली आहे. (Anushka Sharma Second Pregnancy)

अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं बोललं जात आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर आहे. लवकरच अनुष्का व विराट ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर करणार आहेत. पण सध्यातरी अनुष्काच्या दुसऱ्या गरोदरपणाबाबत न बोलणं त्यांनी पसंत केलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी विराट व अनुष्काने त्यांचे फोटो पोस्ट न करण्यास पापाराझी छायाचित्रकारांना सांगितलं होतं.

आणखी वाचा – Video : गणपतीसाठी कोकणातील गावी गेलेल्या अविनाश नारकरांचा ‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “ऐश्वर्या मॅडम…”

विराट व अनुष्का एका प्रसुती क्लिनिकबाहेरही दिसले होते. या क्लिनिकबाहेरचे फोटो पापाराझींनी पोस्ट करु नये अशी या दोघांनी विनंती केली होती. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून अनुष्का लाइमलाइटपासून दूर असल्याची चर्चा आहे. अंबानी कुटुंबियांच्या घरी गणपती दर्शनासाठी संपूर्ण कलाविश्व होतं. मात्र यावेळी विराट व अनुष्का कुठेच दिसले नाहीत.

आणखी वाचा – “जास्त दारू प्यायली का?”, सुकन्या मोनेंच्या ‘त्या’ व्हिडिओवर महिलेची कमेंट, अभिनेत्री म्हणाली, “ही नशा…”

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

खासगी आयुष्याबाबत अधिकाधिक न बोलणंच दोघं पसंत करतात. लेक वामिकाच्या जन्मानंतरही कित्येक महिने त्यांनी आपल्या मुलीला मीडियापासून दूर ठेवलं. मुलीचा चेहरा दाखवण्यासाठीही नकार दिला. अजूनही त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा सगळ्यांसमोर दाखवलेला नाही. आता खरंच अनुष्का गरोदर आहे का? की या निव्वळ चर्चा आहेत हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

Tags: bollywood actressentertainmententertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Dilip Joshi aka Jethalal take a break from TMKOC

'तारक मेहता…'मधून जेठालाल उर्फ दिलीप जोशींनी घेतला ब्रेक, चाहत्यांना धक्का, पण यामागचं नेमकं कारण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.