मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : गणपतीसाठी कोकणातील गावी गेलेल्या अविनाश नारकरांचा ‘पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “ऐश्वर्या मॅडम…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 28, 2023 | 9:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Avinash Narkar On Ganeshotsav and Konkan

Video : गणपतीसाठी कोकणातील गावी गेलेल्या अविनाश नारकरांचा 'पप्पांनी गणपती आणला' गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, "ऐश्वर्या मॅडम…"

सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु असताना अनेकजण बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. अनेकांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. काहींच्या राहत्या घरी तर काहींच्या मूळगावी बाप्पाचं आगमन झालं आहे. अनेक चाकरमानी बाप्पाच्या दर्शनासाठी मूळगावी रवाना झाले होते. सर्वसामान्यांप्रमाणे मराठी मनोरंजन सृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते अविनाश नारकर हे देखील गणेशोत्सवासाठी त्यांच्या गावी गेले आहेत. विशेष म्हणजे, तब्बल चार वर्षांनी ते त्यांच्या गावी गेले असून त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला होता. (Avinash Narkar On Ganeshotsav and Konkan)

यंदाचा गणेशोत्सव नारकरांसाठी विशेष आहे. कारण, त्यांनी यंदाचा गणेशोत्सव आपल्या कोकणातील गावी साजरा केला आहे. गणेशोत्सवानिमित्ताने अविनाश नारकर हे गावी जरी गेले असले तरी त्यांची गावाकडची ओढ प्रत्येक व्हिडिओमधून दिसून येतेय. अविनाश नारकर यांनी गावच्या निसर्गरम्य वातावरणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्यांच्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कारण या व्हिडिओमध्ये त्यांनी निसर्गाचं कौतुक करत गणपती बाप्पाच्या गाण्यावर ठेका धरला आहे. नारकर हे रील्स व व्हिडीओसाठी प्रसिद्ध आहेत. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या नारकर कपलच्या डान्सला तोडच नाही.

आणखी वाचा – “मी तुमची पूर्वीपासूनच…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नीने सुकन्या मोनेंचं केलं तोंडभरुन कौतुक, अभिनेत्रीचा घरी बोलावून केला पाहुणचार

View this post on Instagram

A post shared by Avinash Narkar (@avinash.narkar)

नुकताच एक गावच्या नयनरम्य वातावरणातील व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये “हे माझं गाव. भुईबावडा, वरती गगनबावडा आणि खाली घाट उतरला की भुईबावडा. काय अप्रतिम निसर्ग आहे बघा. या सगळ्यापेक्षा आणखी वेगळा असा स्वर्ग काय असतो? म्हणून तर गावी यायलाच पाहिजे आणि गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये यायलाच पाहिजे.” असं म्हणत त्यांनी ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर ठेका धरला.

आणखी वाचा – रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टने शेअर केले दोघांचे Unseen फोटोज्, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझा चांगला…”

हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन देत म्हटलं आहे की, “यंदा गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी गावी गेलो होतो! व्वा व्वा व्वा !! निसर्गाच्या सहवासात मन आणि शरीर बघा कसं ताजंतवानं आणि टवटवीत होतं ते!! निसर्गाचा सहवास आणि बाप्पाचा ध्यास, करी साऱ्या दु:खांचा ह्रास !! गणपती बाप्पा मोरया !” त्यांच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं आहे की, “आमचं पण गाव हेच आहे.” तर एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “ऐश्वर्या मॅडम नाही आल्या का?”. अविनाश नारकरांचा गावच दर्शन घडविणारा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडला आहे.

Tags: avinash narkaravinash narkar reelentertainmentmazya pappani ganpati anala
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
'Harry Potter' fame Michael Gambon passed away

'हॅरी पॉटर'मधील 'मिस्टर डंबलडोअर' यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन, मायकेल गॅम्बॉन अनेक दिवसांपासून होते आजारी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.