मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“उपेंद्र लिमयेंना लोक का घाबरतात?”, प्रश्न विचारताच अभिनेत्याने सांगितलं सत्य, म्हणाले, “माझ्यापासून चार हात लांब…”

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 8, 2023 | 1:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Upendra limaye talk about why are people afraid of them

Upendra limaye talk about why are people afraid of them

सध्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. अभिनेता रणबीर कपूरचा हा चित्रपट जगभरात बराच गाजतान दिसत आहे. या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्यांची म्हणजे उपेंद्र लिमये यांची सगळ्यांच विशेष लक्ष वेधत आहे. मध्यांतरापूर्वी त्यांचा छोटासा सीन प्रेक्षकांना टाळ्या व शिट्ट्या वाजवायला भाग पाडतो. या कलाकाराने आजवर बऱ्याच दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे. अगदी ‘सरकरा राज’ चित्रपटामध्ये ही त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं आहे. पण उपेंद्र यांच्याबरोबर काम करताना इतर कलाकार घाबरताना दिसतात. पण ते कलाकार का घाबरतात याचा उलघडा त्यांनी नुकताच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात केला. (Upendra limaye talk about why are people afraid of them)

तुम्ही काहीही न करता लोक तुम्हाला का घाबरतात? या प्रश्नावर उत्तर देत उपेंद्र यांनी उलगडा केला की, “माझ्याबाबतीत असं कायम होत असतं. पत्रकारांचंच नाही तर सामान्य माणसही मला घाबरतात. अगदी नवीन कलाकारांचंही बऱ्याचदा असं होतं. मग त्यावर उपाय म्हणून मी त्यांच्याबरोबर खूप मैत्रीपूर्वक बोलतो. पण कसं आहे ते मैत्रीपूर्वक वातावरण निर्माण व्हायला हवं. कादाचित माझं व्यक्तिमत्त्व तसं असेल म्हणून किंवा मला मिळालेला भारदस्त आवाज त्यामुळे लोक मला घाबरत असतील. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की माझ्यापासून चार हात लांबच राहावं. पण लोक असा विचार करणं स्वभाविक आहे. त्याला मी काही करु शकत नाही. पण मग मी त्यांना कधीतरी म्हणतो, की तुम्ही माझ्याबरोबर राहून बघा. मग तुम्हाला कळेल की मी किती प्रेमळ आहे”, असं सांगत त्यांनी सगळे का घाबरतात याचा उलघडा केला.  

आणखी वाचा – बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, सचिन पिळगांवकर व जितेंद्र यांना शेवटचं भेटण्याची इच्छा व्यक्त केली अन्…

उपेंद्र पुढे सांगतात, “काम करत असताना कलाकारांना दडपण आलं असेल तर मग पुढे गडबड होऊ शकते. म्हणून मग माझा स्वतःचा असा प्रयत्न असतो की कोण नविन असेल. विशेषतः जर ती मुलगी असेल कारण मुली जरा जास्तच घाबरतात. त्यामुळे मी पहिल्यापासून त्यांना असं म्हणतो की, तो जो काही सीन आहे तो शंभर मीटर पळण्याची स्पर्धा नाही. मी तुमच्यात किती भारी काम करून दाखवतो हे महत्त्वाचं नाही”,

आणखी वाचा – “त्याची लायकी नाही”, गायक अभिजीत भट्टाचार्य यांचे सलमान खानबाबत धक्कादायक वक्तव्य म्हणाले, “पाकिस्तानसाठी प्रामाणिकपणा…”

उपेंद्र पुढे अभिनयाबाबत स्पष्ट करतात, “केमिस्ट्री जुळून आली तर सीन छान होणार आणि तरच तो सीन लोकांना आवडणार. त्यामुळे मला केमिस्ट्री जुळून येण्यासाठी मग अभिनय करताना थोडा खेळकरपणा, मजेशीरपणा तसेच धमाल करावी लागते. त्यामुळे तो मोकळेपणा आला तरच कलाकार छान मोकळेपणाने अभिनय करु शकतो”, असं सांगत त्यांनी कलाकारांबरोबर त्यांचा वावर कसा असतो हे सांगितलं.   

Tags: Animal famemarathi actorpeople afraid of themUpendra limaye
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Mugdha Vaishampayan Sister Wedding

असं पार पडलं मुग्धा वैशंपायनच्या बहिणीचं लग्न, साधेपणाने वेधलं लक्ष, गायिकेनेही साधाच लूक केला अन्…; फोटोंची तुफान चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.