सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कंगना रनौतचा बॉलिवूडला राम-राम?, निवडणूक प्रचारादरम्यान केलेलं भाष्य चर्चेत, म्हणाली, “एकच काम करायला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 6, 2024 | 5:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kangana ranaut on bollywood

कंगना रनौतचा बॉलिवूडला राम-राम?, निवडणूक प्रचारादरम्यान केलेलं भाष्य चर्चेत, म्हणाली, "एकच काम करायला…”

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिला भाजपकडून उमेदवारी मिळाली होती. हिमाचल प्रदेशमधील मंडी या भागातून ही उमेदवारी तिला मिळाली होती.  त्यानंतर मोठ्या जोमात ती प्रचाराच्या कामासाठी लागली होती. अशातच आता तिचे अजून एक वक्तव्य खूप चर्चेत आले आहे. तिने प्रचारादरम्यान अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते जे आता खूप चर्चेत आले आहे. (kangana ranaut on bollywood)

लोकसभा तिकीट मिळाल्यानंतर कंगना मंडी येथे अनेक भागांमध्ये भाषण करताना दिसली. यावेळी तिने निवडणुकांमध्ये यश मिळाल्यास मनोरंजन क्षेत्र सोडू शकते असेदेखील ती म्हणाली होती. याबद्दल ती माध्यमांशी बोलताना व्यक्त झाली आहे. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, “मला चित्रपटांमध्ये कंटाळा येतो. मी भूमिका करते, मी दिग्दर्शनदेखील करते. जर मला राजकारणात यश आले आले तर किंवा लोक माझ्याशी जोडले गेले तर मी राजकारणात सक्रिय राहीन. मला कोणतंतरी एकच काम करायला आवडेल. जर मला वाटलं की लोकांना माझी गरज असेल तर मी त्याप्रमाणे काम करेन. मी जर मंडीतून जिंकून आले तर मी राजकारणात कायमस्वरूपी राहीन. मला अनेक चित्रपट निर्माते राजकारणात न जाण्याचेही सल्ले देतात”.

आणखी वाचा – “बरीच मुलं वारसा घेतात पण…”, अभिनय बेर्डेबद्दल प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शकाची खास पोस्ट, म्हणाला, “अतिशय गुणी, मेहनती…”

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

पुढे ती म्हणाली की, “मी राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल कुठेही गेले तरीही लोकांकडून खूप प्रेम मिळते. मनोरंजन चित्रपटसृष्टीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यानंतर जर कोणाला सन्मान मिळत असेल तर ती व्यक्ती मी आहे”.

आणखी वाचा – ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीची रील पाहून चाहत्यांनी करुन दिली बायकोची आठवण, म्हणाले, “वहिनी झाडू घेऊन…”

कंगना सध्या भाजपच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशातील मंडीमधून लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी होत आहे. यासाठी ती पूर्णपणे तयारीत आहे. तसेच तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपत प्रदर्शित होणार आहे. १४ जून २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार  आहे. यामध्ये ती देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.

Tags: bollywood actresskangana ranautpolitics
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय, ५० कोटींची भव्य गुंतवणूक

जून 22, 2026 | 4:07 pm
Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Next Post
Preity Zinta talked on having Mahendra Singh Dhoni in her team kings eleven Punjab.

प्रीती झिंटाही आहे महेंद्रसिंह धोनीची चाहती, धोनीला स्वत:च्या संघात घेण्याबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, “माझी अशी इच्छा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.