बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानच्या मैत्रीचे जितके किस्से आहेत त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या वादाचे किस्से चर्चेत आहेत. आतापर्यंत त्याने बऱ्याच सेलिब्रेटींबरोबर वाद घातले आहेत. यामधील एका नाव म्हणजे पार्श्वगायन अभिजीत भट्टाचार्य. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सलमानवर निशाणा साधत त्याला चांगलच सुनवलं आहे. अभिजित यांनी एकीकडे शाहरुखला स्टारडमसाठी दुसऱ्यांचा वापर करणारा अभिनेता असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे सलमानला त्यांच्या द्वेषाच्याही लायकीचा नसलेला अभिनेता असं म्हटलं आहे. त्याबरोबर त्यांनी सलमानबाबत त्यांच्या मनात राग नसून तो त्याच्या द्वेषाच्याही लायकीचा नाही याचा खुलासा केला. (abhijeet bhattacharya lashes out at salman)
अभिजीत व सलमानचा वाद २०१५पासून सुरु झाला. तेव्हा अभिजीत यांनी सलमानविरुद्ध ट्वीट केलं होतं ज्यामुळे हा वाद बराच वाढला. आता पुन्हा अभिजीत यांनी सलमानवर निशाणा साधत त्याच्यावर बरेच आरोप केले. अभिजीतन यांनी सांगितलं की सलमानने आपल्या देशातील गायकांऐवजी दुश्मन देशातील गायकांना प्रोत्साहन दिलं.
एका युट्युब चॅनल दिलेल्या मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्य यांना विचारण्यात आलं की त्याचं सलमानबरोबर कसं नातं आहे? यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “मला नाही वाटत की तो माझ्या द्वेषाच्याही लायकीचा आहे. सलमानला मी माझ्या रागाचाही लायकीचा समजत नाही. त्याला जे काही मिळालं आहे ते सगळं त्याला आशीर्वादांमुळे मिळालं आहे. तो सगळ्यांच्या प्रार्थनांमुळेच पुढे जात आहे”. अभिजीत यांनी पुढे सांगितलं की सलमानला असं वाटतं की तो आता देव बनला पण ते तसं नाही आहे.
अभिजीत यांनी २०१५ला सलमानच्या ‘हीट अँड रन’च्या केसवर ट्वीट करत त्यांनी सलमानला टोमणा मारला. अभिजीत यांनी ट्वीट केलं होतं की, ‘लोक रस्त्यावर का झोपले? त्यांनी असं रस्त्यावर झोपायला नको होतं’. याबाबत त्याला विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितलं, हे ट्वीट त्यांनी सलमानच्या पाठिंब्यात केलं नव्हतं. याबाबत सांगताना ते बोलतात, “लोक असा विचार कसा करु शकतात की मी त्या माणसाला मी पाठिंबा देणार. त्याने फक्त शत्रू देशातील कलाकरांना पाठिंबा देतो. त्याने भारतातील टॉप गायकांना काढून पाकिस्तानी गायकांना संधी दिल्या. फक्त पाकिस्तानसाठी प्रामाणिकपणा दाखवला. त्याने हे सगळं जाणूनबुजून केलं आहे”, असं सांगत त्यांनी सलमानवर आरोप केले आहेत.