‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राने त्याच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले आहे. सायली व अर्जुन यांच्यात आता प्रेमही फुलत जाताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षक मालिकेला विशेष पसंती दर्शवताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. सगळ्याच वाहिन्यांमधील ही मालिका अव्वल स्थानावर असून लोकप्रियदेखील आहे. (Amit Bhanushali Funny Video)
या मालिकेत अर्जुन ही भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशाली खऱ्या अर्थाने चर्चेत आला आहे. अमितला अर्जुन या भूमिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. अमितने अनेक मराठी, हिंदी व गुजराती भाषेतील अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावरही अमित बऱ्यापैकी सक्रिय असतो. विशेषतः विविध हटके रील व्हिडीओ तो बनवून शेअर करताना दिसतो. तसेच मालिकेच्या सेटवरील धमाल मस्ती वा सहकलाकारांबरोबची ऑफ स्क्रीन बॉन्डिंगही तो आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतो.
अशातच अमितने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. अमितने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर रील शेअर केली आहे. यांत अमित असं म्हणताना दिसत आहे की, “मी तुम्हाला शेवटचं विचारत आहे, तुमचा कोणी जानूमानू आहे की मी मेसेज करु?”. अमितचा हा व्हिडीओ चर्चेत आला असून अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. अभिनेत्याच्या या गमतीशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला बायकोची आठवण करुन दिली आहे.
अमितचा हा गंमतीशीर रील व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने कमेंट करत “घरी गेल्यावर श्रद्धा वहिनी झाडू घेऊन उभी असेल”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने, “श्रद्धा वहिनी, हा बघा काय बोलतोय”, असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने, “कर आणि मार खा तुझ्या बायकोचा”, असं म्हटलं आहे. तर एकाने, “आधी वाहिनीला विचारा सर, त्यानंतर मला चालेल”, असं म्हटलं आहे.