रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रीती झिंटाही आहे महेंद्रसिंह धोनीची चाहती, धोनीला स्वत:च्या संघात घेण्याबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, “माझी अशी इच्छा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 6, 2024 | 6:07 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Preity Zinta talked on having Mahendra Singh Dhoni in her team kings eleven Punjab.

प्रीती झिंटाही आहे महेंद्रसिंह धोनीची चाहती, धोनीला स्वत:च्या संघात घेण्याबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, “माझी अशी इच्छा...”

भारतीय क्रिकेट संघात धडाकेबाज खेळाडू म्हणून महेंद्रसिंह धोनीचा नावलौकिक आजही कायम आहे. धोनीने २००८ ला आयपीएलमध्ये पदार्पण करत आतापर्यंत एकूण २५९ सामने खेळले आहेत. ४२ वर्षीय धोनी सर्वात यशस्वी असा कर्णधार आहे, ज्याने आयपीएलमध्ये ५ वेळा संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे धोनीची लोकप्रियता आजही कायम आहे. त्याच्या खेळाचे आजवर अनेकांकडून कौतुक होत आहे. त्यामुळे धोनीची लोकप्रियता ही केवळ चाहत्यांमध्येच नाही तर आयपीएल संघ मालकांमध्येही आहे.

अशातच बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटानेही धोनीला आपल्या संघात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्री प्रीती झिंटा ही बऱ्याच काळापासून मनोरंजन क्षेत्रापासून असली तरी ती तिच्या आयपीएल टीम पंजाब किंग्समुळे चर्चेत असते. अलीकडेच धोनीला तिच्या संघात घेण्याची इच्छा व्यक्त केली. प्रीतीने सोशल मीडियावर प्रश्नोत्तरांचा सेगमेन्ट घेतला होता. यावेळी एका चाहत्याने “मला धोनीला पंजाब किंग्ज या टीममध्ये पाहायचे आहे” असा प्रश्न विचारला.

Everyone wants him and everyone is his fan including me. Yesterday was bittersweet. I wanted us to win and him to hit some big sixes but we lost and he got out. The only bright spot was our bowlers did so well in restricting them but eventually it was not enough. https://t.co/24QcqGE93i

— Preity G Zinta (@realpreityzinta) May 6, 2024

आणखी वाचा – “तब्येत जपा, खंडोबा आपणास…”, शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं भाष्य, म्हणाला, “तुमची मेहनत घेण्याची क्षमता…”

चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देत प्रीती असं म्हणाली की, “’प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करतो आणि प्रत्येकजण त्याचा चाहता आहे आणि त्याच्या अनेक चाहत्यांमध्ये माझाही समावेश आहे. कालच्या सामान्यामुळे माझे मन थोडे वाईट होते. आम्ही जिंकावे अशी माझी इच्छा होती आणि त्याने काही मोठे षटकार मारले. पण आम्ही हरलो आणि तो बाद झाला. एकच चांगली गोष्ट म्हणजे आमच्या गोलंदाजांनी त्यांना रोखण्यात चांगली कामगिरी केली पण ते पुरेसे नव्हते”.

आणखी वाचा – “बरीच मुलं वारसा घेतात पण…”, अभिनय बेर्डेबद्दल प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शकाची खास पोस्ट, म्हणाला, “अतिशय गुणी, मेहनती…”

दरम्यान, अभिनेत्री प्रीती झिंटा ही लवकरच ‘लाहोर १९४७’ या चित्रपटात दिसणार आहे. प्रीती झिंटा ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे, पण तिने स्वत:ला बऱ्याच काळापासून अभिनयाच्या क्षेत्रापासून दूर ठेवले आहे. तिने बॉबी देओलबरोबर ‘सोल्जर’, सनी देओलबरोबर ‘फर्ज’, शाहरुख खानबरोबर ‘वीर-जरा’, सलमान खानबरोबर ‘चोरी-चोरी चुपके-चुपके’, आमिर खानबरोबर ‘दिल चाहता है’ आणि हृतिक रोशनबरोबर ‘कोई मिल गया’ असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Tags: IPL Marathi Newsmahendra singh dhoniPreity Zinta
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Gautami Patil will be seen in Bigg Boss Marathi fame Utkarsh Shinde's Lavani photo viral

‘बिग बॉस मराठी’ फेम ‘या’ अभिनेत्याबरोबर दिसली गौतमी पाटील, लवकरच घेऊन येणार एक नवीन गाणं, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.