सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरून त्यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटोस, व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. नुकतंच सुरुची अडारकर-पियुष रानडे विवाहबंधनात अडकले. याआधी प्रसाद-अमृताच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. यानंतर गायिका मुग्धा वैशंपायन हिच्या घरीही लग्नाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. (Mugdha Vaishampayan Sister Wedding)
मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे याने आमचं ठरलं म्हणत एकत्र फोटो शेअर करत त्याच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. वैशंपायन यांच्या घरी सुरु असलेली धामधूम मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाची नसून तिची मोठी बहीण मृदुलची आहे. तीन-चार दिवसांपासून तिच्या लग्नाआधीच्या विधींच्या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मुग्धाच्या बहिणीची जोरदार लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे.
दोन दिवसांपूर्वी मुग्धाच्या बहिणीचं लग्न झालं. तिच्या बहिणीच्या लग्नातील फोटोही समोर आले आहेत. पारंपरिक अंदाजात नववधूवराचा लूक लक्ष वेधून घेत आहे. मुग्धाची बहीण मृदुलच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुग्धा वैशंपायनच्या बहिणीच्या लग्नसोहळ्यात खास क्षणांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अत्यंत साधेपणाने त्यांनी हे लग्न केलं आहे. दरम्यान या फोटोंमध्ये लग्नादरम्यानच्या विधींमध्ये मुग्धानेही सहभाग घेतलेला पाहायला मिळत आहे. तिच्या बहिणीच्या नवऱ्याचा कान पिळण्याचा विधी मुग्धाने पार पाडला आहे.
मेहुणीच्या लग्नाला प्रथमेश लघाटेनेही हजेरी लावली होती. तर प्रथमेशने खास मेहुणीच्या मेहंदी सोहळ्याचा फोटो देखील शेअर केला होता. मुग्धाने ताईला हळद लागल्यानंतरचा एकत्र फोटो पोस्ट करत त्या फोटोला ‘ताईची हळद’ असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर मुग्धाच्या बहिणीचे ग्रहमखचे फोटोही समोर आले होते. अत्यंत साधेपणाने हे सगळे विधी पार पडत आहेत. यांत तिच्या बहिणीच्या पारंपरिक अंदाजाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.