शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“राग, वेदना, असहाय्यता अन्…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर भारावली अमृता खानविलकर, अंकिता लोखंडेचे कौतुक करत म्हणाली, “मला तुझा अभिमान…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 1, 2024 | 11:02 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Khanvilkar praised the Swatantryaveer Savarkar movie and Ankita Lokhande's role.

“राग, वेदना, असहाय्यता अन्...”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर भारावली अमृता खानविलकर, अंकिता लोखंडेचे कौतुक करत म्हणाली, “मला तुझा अभिमान...”

बॉलिवूड अभिनेता रणदीप हूड्डा हा गेले काही दिवस त्याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील सावरकरांच्या भूमिकेने तो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अभिनयासह लेखन व दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत चांगली कमाई केली असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सामान्य प्रेक्षकांसह मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीदेखील या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

शरद पोंक्षे, प्रवीण तरडे, सुबोध भावे, प्रसाद ओक यांसह अनेक कलाकार मंडळींनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरनेही हा चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने या चित्रपटाचे, चित्रपटातील कलाकारांचे कौतुक केले आहे. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चित्रपटाविषयी एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

आणखी वाचा – “खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओक स्पष्टच बोलला, म्हणाला, “विचारपूर्वक…”

अमृताने ही पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “काल ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट मराठीत पाहण्याची संधी मिळाली. या चित्रपटात वीर सावरकरांच्या अदम्य भावनेचे किती मनमोहक चित्रण आहे. रणदीप हुड्डा यांनी अगदी कुशलतेने व प्रभावीपणे ही भूमिका साकारली आहे. तसेच चित्तथरारक छायाचित्रणासह सावरकरांचा प्रवास या चित्रपटातून जिवंत केला आहे. त्याचबरोबर या चित्रपटात असे काही क्षण आहेत जे तुम्हाला वेदना, राग, असहाय्यता पाहायला मिळते.”

आणखी वाचा – “कधी हिंदू तर कधी…”, राखी सावंतने केलेल्या आरोपांवर पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीचा संताप, म्हणाला, “माझी प्रतिमा…”

यापुढे अमृताने तिची मैत्रीण व अभिनेत्री अंकिता लोखंडेचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “यमुनाबाई म्हणून अंकिताने एक अविस्मरणीय कामगिरी करत ती किती सशक्त अभिनेत्री आहे हे तिने दाखवून दिले आहे. काय कमाल काम केले आहेस अंकिता. मला तुझा अभिमान वाटतो आणि सर्वात शेवटी सुबोध भावेच्या आवाजाने मला खरोखरच सावरकरांच्या प्रत्येक शब्दाचे, कृतीचे आणि भावनांचे गांभीर्य अगदी प्रकर्षाने जाणवले.” दरम्यान, अमृताने शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

Tags: amruta khanvilkarankita lokhandemarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
MCA On Trolling Of Hardik Pandya

हार्दिक पांड्याला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याच्या चर्चांवर मुंबई क्रिकेट असोसिएशनचं स्पष्टीकरण, म्हणाले, "BCCIच्या नियमांनुसार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.