रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कधी हिंदू तर कधी…”, राखी सावंतने केलेल्या आरोपांवर पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीचा संताप, म्हणाला, “माझी प्रतिमा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 1, 2024 | 10:14 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Adil Khan Durrani On Rakhi Sawant

"कधी हिंदू तर कधी...", राखी सावंतने केलेल्या आरोपांवर पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीचा संताप, म्हणाला, "माझी प्रतिमा..."

आदिल खान दुर्रानी आणि राखी सावंत यांच्यातील यांच्यातील वाद हा काळाबरोबर वाढतच चालला आहे. दोघेही एकमेकांवर वेगवेगळे आरोप करताना नेहमीच दिसतात. सोशल मीडियावरुन दोघेही नेहमीच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. सोशल मीडियावर आदिल व राखी दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात. राखी सावंतने नुकताच असा आरोप केला होता की, सोमी खानबरोबर लग्न होऊनही आदिल तिला परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिल खान दुर्रानीने राखी सावंतच्या या प्रश्नाचे उत्तर देत भाष्य केलं आहे. (Adil Khan Durrani On Rakhi Sawant)

“ते स्क्रीनशॉट आणि मॅसेज जुने आहेत. वर्षभरापूर्वीचे किंवा त्याच्याही आधीचे आहेत”, असं आदिलने TOI शी बोलताना सांगितले. राखी सावंतच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देताना आदिल म्हणाला की, “राखी सावंत स्वतःला हिंदू म्हणवते तर कधी मुस्लिम बनते. राखी सावंतकडे दुसरे काही काम नाही म्हणून ती सतत आरोप करत असते”.

आणखी वाचा – Video : प्रियाने अर्जुनला रंग लावताच सायलीचा पारा चढला, भर कार्यक्रमात धक्का मारला अन्…; पाहा प्रोमो

राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल म्हणाला, “ती नेहमीच असं करते. तिला माझ्या आयुष्यात परत आणण्यात मला काही रस नाही. मी माझ्या पत्नीबरोबरच्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि तिला परत मिळवण्यासाठी मला कोणाला कॉल करण्याची गरज नाही. तिने मला यापूर्वी जे काही मॅसेज केले आहेत, ते मी आधीच सार्वजनिक डोमेनमध्ये आणले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता. मी तुम्हाला याआधीही सांगितले आहे की, ती विवादाशिवाय आयुष्य जगू शकत नाही”.

आणखी वाचा – लेकासाठी कायपण! वडील झाल्यानंतर विक्रांत मेस्सीने मुलासाठी केली ही खास गोष्ट, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव अन्…

आदिल पुढे असंही म्हणाला की, “कधी माझे नाव घेऊन वाद होतो, कधी मला तुरुंगात पाठवून वाद होतो, हे माझ्यावर अवलंबून आहे. तिचा उदरनिर्वाह माझ्यावर अवलंबून आहे, माझी प्रतिमा खराब करुनच ती जिवंत आहे. जोपर्यंत माझा आणि सोमीचा संबंध आहे, ती आणि मी पती-पत्नी आहोत आणि आम्ही दोघे नेहमीच एकमेकांसाठी उभे असतो. पती-पत्नीचे नाते न समजणारी स्त्री आयुष्यात काय करणार? हे मी राखी सावंतच्या उदाहरण देत सांगतो”.

Tags: Adil Khan DurraniAdil Khan Durrani On Rakhi Sawantentertainmentrakhi sawant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Prasad Oak On Swatantra veer Savarkar Movie

"खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका", ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओक स्पष्टच बोलला, म्हणाला, "विचारपूर्वक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.