सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मराठीमधील आणखी एका जोडप्याचं ठरलं लग्न, केळवणालाही सुरुवात, अभिनेता आहे सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा लेक, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 6, 2024 | 2:23 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Amruta Bane and Shubhankar Ekbote shared a special video of their Kelvan on social media

Video : मराठीमधील आणखी एका जोडप्याचं ठरलं लग्न, केळवणालाही सुरुवात, अभिनेता आहे सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा लेक, व्हिडीओ व्हायरल

मराठी सिनेसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्नसराई सुरु आहे. प्रथमेश परब, तितीक्षा तावडे, पूजा सावंत व नुकतीच योगिता चव्हाण या कलाकार मंडळींनी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. अशातच आता छोट्या पडद्यावरील आणखी एक लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकणार आहे आणि ही जोडी म्हणजे अभिनेता शुभंकर एकबोटे व अभिनेत्री अमृता बने. शुभंकर-अमृता यांचा नोव्हेंबर महिन्यात मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला होता. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे.

लग्नाआधी होणाऱ्या नवरा-नवरीचे कौतुक म्हणून केळवण करण्याची पद्धत असते. त्यामुळे आता शुभंकर व अमृता यांच्या केळवणालादेखील सुरुवात झाली आहे. नुकतेच शुभंकर-अमृताचे पहिले केळवण साजरे करण्यात आले. हॅशटॅग अशुचं केळवण असे म्हणत त्यांनी पहिल्या केळवणाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमृताच्या आईने या खास केळवणाचे आयोजन केले असून श्रीखंड-पुरीचा खास बेत केला होता. तसेच ताटाभोवती आकर्षक रांगोळी व फुलांची आरास केली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी त्यांच्या घरीही खास सजावट करुन शुभंकर-अमृताचे स्वागत करण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by Amruta Bane (@amruta.bane14)

आणखी वाचा – हिंदी शोमध्ये कुशल बद्रिकेची एन्ट्री, निलेश साबळेनंतर ‘चला हवा येऊ द्या’ सोडणार असल्याच्या चर्चांवर दिलं उत्तर, म्हणाला, “मी शोमध्ये…”

शुभंकर-अमृता यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना हा व्हिडीओ आवडला असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांना शुभंकर-अमृताची ही जोडीही आवडली असल्याचे म्हटले आहे. शुभंकर-अमृता दोघेही ‘कन्यादान’ या मालिकेतून एकत्रित काम करत होते. रील लाईफमध्ये लोकप्रिय जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमृता व शुभंकर यांनी त्यांच्या रिअल लाईफमध्येही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा – “फालतुपणा, तितीक्षाचं लग्न झालं म्हणून…”, ‘सातव्या मुलीची…’ मालिकेवर भडकले प्रेक्षक, नव्या ट्वीस्टमुळे संतप्त, म्हणाले, “रट्याळ कथानक आणि…”

दरम्यान, ‘कन्यादान’ मालिकेत अमृता बनेने वृंदा आणि शुभंकर एकबोटेने राणा हे पात्र साकारले आहे. या मालिकेच्या सेटवरच अमृता-शुभंकर यांची पहिल्यांदा भेट झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी त्यांचे अनेक चाहतेही चांगलेच उत्सुक आहेत.

Tags: amruta baneentertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsshubhankar ekboteअमृता बनेमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनशुभंकर एकबोटे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Rakesh Poojary Death
Entertainment

अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्…

मे 12, 2025 | 4:05 pm
Vaama Ladhai Sanmanachi
Entertainment

मराठीत ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची चर्चा, स्त्रियांचा संघर्ष अधोरेखित करणारं कैलास खैर यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

मे 12, 2025 | 3:39 pm
Next Post
Kiran Rao On Aamir Khan

"मला यांच्याच अवतीभोवती राहायचं आहे आणि…", घटस्फोटानंतरही किरण रावला हवा आहे आमिर खानचा सहवास, म्हणाली, "माझ्या मनात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.