शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला यांच्याच अवतीभोवती राहायचं आहे आणि…”, घटस्फोटानंतरही किरण रावला हवा आहे आमिर खानचा सहवास, म्हणाली, “माझ्या मनात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 6, 2024 | 3:12 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kiran Rao On Aamir Khan

"मला यांच्याच अवतीभोवती राहायचं आहे आणि…", घटस्फोटानंतरही किरण रावला हवा आहे आमिर खानचा सहवास, म्हणाली, "माझ्या मनात…"

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानने आजवर त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आमिर खानचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. बरेचदा आमिर खान त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला असल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेषतः आमिर त्याच्या व त्याच्या पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावमुळे चर्चेत आला असल्याचं पाहायला मिळालं आहे. किरण राव व आमिर खान यांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले आहेत. असं असलं तरी बरेचदा ते एकत्र स्पॉट होताना दिसले आहेत. (Kiran Rao On Aamir Khan)

आमिर व किरण राव वेगळे झाले असले तरी नेहमीच ते कामानिमित्त एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वीच आमिर खान व किरण यांनी मिळून लापता लेडीज या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ही जोडी बरेच ठिकाणी एकत्र दिसली. इतकंच नव्हेतर आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नातही किरण राव सहभागी झाली होती. अनेकदा मीडियासमोर किरण आमिरबद्दलच्या नात्यावरुन भाष्य करत असते. लग्नाच्या १६ वर्षानंतर दोघांनी एकत्र निर्णय घेत घटस्फोट घेतला.

आणखी वाचा – ‘बाईपण भारी देवा’च्या अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, सुकन्या मोनेंचा आनंद गगनात मावेना, म्हणाल्या, “श्री स्वामी समर्थ…”

अशातच किरण रावने ‘सकाळ न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खानबरोबर कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. किरण रावने म्हटलं की, “आमची मैत्री खूप निरागस आहे. आम्ही नेहमीच एकत्र काम करतो. पाणी फाऊंडेशनसाठी आम्ही एकत्र काम करत आहोत. कारण आम्हाला एकमेकांसह काम करायला आवडतं. एकमेकांबद्दल आमच्या मनात खूप आदर आहे. हे माझे कुटुंब आहेत. त्यामुळे यांच्यासह काम करायला मला आवडतं. संपूर्ण आयुष्यभर त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडेल. आणि मला त्यांच्याबरोबर राहायलाही आवडेल. त्यांच्या अवतीभोवती कायम राहायचं आहे. या सूर्याभोवती मला कायम फिरत राहायला आवडेल”.

आणखी वाचा – Video : मराठीमधील आणखी एका जोडप्याचं ठरलं लग्न, केळवणालाही सुरुवात, अभिनेता आहे सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा लेक, व्हिडीओ व्हायरल

किरण खासगी तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दल नेहमीच दिलखुलासपणे व्यक्त होत असते. आमिरबद्दल कौतुक करताना ती कधीही थांबत नाही. त्यांचा जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा आमिरने सर्व परिस्थिती अत्यंत व्यवस्थितपणे हाताळली असल्याचेही तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

Tags: aamir khanaamir khan wifeentertainmentkiran rao actressKiran Rao On Aamir Khan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Saleel Kulkarni shared satirical post about standup comedy see the details

"अश्लील, कौटुंबिक विनोद करुन...", स्टँडअप कॉमेडीवरुन सलील कुलकर्णींचा संताप, नक्की रोख कोणाकडे?, म्हणाले, "प्रत्येक वाक्यात शिव्या..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.