गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“फालतुपणा, तितीक्षाचं लग्न झालं म्हणून…”, ‘सातव्या मुलीची…’ मालिकेवर भडकले प्रेक्षक, नव्या ट्वीस्टमुळे संतप्त, म्हणाले, “रट्याळ कथानक आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 6, 2024 | 12:23 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Satvya mulichi satavi mulagi serial new promo out audience disoppoint on letest twist

"फालतुपणा, तितीक्षाचं लग्न झालं म्हणून...", 'सातव्या मुलीची...' मालिकेवर भडकले प्रेक्षक, नव्या ट्वीस्टमुळे संतप्त, म्हणाले, "रट्याळ कथानक आणि..."

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेचे रहस्यमय कथानक व मालिकेत येणारे रोजचे नवनवीन ट्विस्ट् या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवत आहेत. अशातच मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला असून या ट्विस्टमुळे चाहत्यांचा हिरमोड झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या प्रोमोमध्ये अस्तिका ही नेत्राच्या रूपात आली असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अद्वैतसह सगळेच गोंधळात पडले आहेत. अस्तिका स्वत:ला नेत्रा समजत आहे, तसेच ती सर्वांना मी अस्तिका नाही तर नेत्रा असल्याचे सांगत आहे. यानंतर अस्तिका स्वत:ला आरशात पाहते तेव्हा तिलाही ती नेत्रा नसल्याचे कळते आणि त्यामुळे स्वत:चा खरा चेहरा बघून तिचाही गोंधळ उडतो.   

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – कॉमेडियन कृष्णा अभिषेकने स्वतःहून सांगितले त्याचे मानधन, गोविंदाचा भाचा असल्याचाही झाला फायदा, म्हणाला, “केवळ पैशासाठी…”

याच नवीन प्रोमोखाली नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स करत त्यांना हा नवीन ट्विस्ट आवडला नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांनी या प्रोमोखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “याला पूर्णपणे फालतूपणा म्हणतात, एकेकाळी ही माझी आवडती मालिका होती, पण आत्ता ही माझी नावडती मालिका झाली आहे” तर आणखी एकाने “मालिका इतकी इतकी चांगली चालू असताना मध्येच हे नवीन करण्याची काय गरज होती” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – आदेश बांदेकरांच्या लेकाचं शिक्षण किती?, वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत मराठी इंडस्ट्रीत करत आहे काम, म्हणाला, “माझं शिक्षण…”

तसेच अनेकांनी “नेत्राने म्हणजेच तितीक्षा तावडेने तिच्या लग्नासाठी सुट्टी घेतली आहे म्हणून हे असं काहीतरी दाखवत आहेत, लग्न झाल्यामुळे नेत्राने मालिका सोडली आहे का?, आता ही मालिका रटाळ झाली आहे, हे काही पटत नाहीये, आता या मालिकेचा वैताग यायला लागला आहे, कृपया काहीही दाखवू नका” अशा कमेंट्स करत मालिकेतील या नवीन ट्विस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आता या मालिकेत पुढे आणखी नवीन काय पाहायला मिळणार यांचीही प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: मनोरंजन बातमीमराठी मनोरंजन बातमीमराठी मालिकामराठी मालिका अपडेट्समराठी बातमीझी मराठी मालिकाentertainment newsmarathi entertainment newsMarathi newsMarathi Serial New Twist सातव्या मुलीची सातवी मुलगीMarathi Serial Updatesmarathi serialsSatvya mulichi satavi mulagiZee Marathi Serials
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

Video : नीता अंबानींचा लेकीसह स्टेजवर जबरदस्त डान्स, कुटुबियांसह उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.