बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हिंदी शोमध्ये कुशल बद्रिकेची एन्ट्री, निलेश साबळेनंतर ‘चला हवा येऊ द्या’ सोडणार असल्याच्या चर्चांवर दिलं उत्तर, म्हणाला, “मी शोमध्ये…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 6, 2024 | 1:22 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Kushal Badrike revealed whether he will be in the show Chala Hawa Yeu Dya or not

हिंदी शोमध्ये कुशल बद्रिकेची एन्ट्री, निलेश साबळेनंतर 'चला हवा येऊ द्या' सोडणार असल्याच्या चर्चांवर दिलं उत्तर, म्हणाला, "मी शोमध्ये..."

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. या कार्यक्रमाने गेली दहा वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन् केले. याया कार्यक्रमासह कार्यक्रमामधील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडेसह अंकुर वाढवे आणि अनेक कलाकारांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमामुळे अभिनेता कुशल बद्रिकेचं नशीब हे खऱ्या अर्थाने ऊजळलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाने कुशलला एक वेगळी ओळख मिळवून दिली. मराठी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर कुशल आता हिंदी विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कुशल लवकरच सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या विनोदी कार्यक्रमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला असून या नवीन व्हिडीओखाली चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देत त्याचे अभिनंदनही केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

आणखी वाचा – “फालतुपणा, तितीक्षाचं लग्न झालं म्हणून…”, ‘सातव्या मुलीची…’ मालिकेवर भडकले प्रेक्षक, नव्या ट्वीस्टमुळे संतप्त, म्हणाले, “रट्याळ कथानक आणि…”

या व्हिडीओखाली कुशलच्या अनेक चाहत्यांनी त्याचे ‘मॅडनेस मचायेंगे’ या नवीन कार्यक्रमासाठी कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट्स केल्या आहेत, मात्र त्यापैकी एका कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कुशलच्या एका चाहत्याने या व्हिडीओखाली कमेंट करत “तुम्ही या हिंदी शोमध्ये असणार तर मग ‘चला हवा येऊ द्या’चं काय होईल?, त्यात तुम्ही असणार की नाही?” असा प्रश्न विचारला आहे. यावर कुशलनेही “हो मी असणार आहे” असं म्हणत त्या चाहत्याच्या कमेंटला उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – कॉमेडियन कृष्णा अभिषेकने स्वतःहून सांगितले त्याचे मानधन, गोविंदाचा भाचा असल्याचाही झाला फायदा, म्हणाला, “केवळ पैशासाठी…”

दरम्यान, कुशल ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी कार्यक्रमात जाणार असल्याचे कळताच तो हवा येऊ द्या मध्ये असणार की नाही? याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण आता स्वत: कुशलनेच याबद्दल उत्तर देत खुलासा केला आहे. त्यामुळे कुशल आता मराठीसह हिंदी प्रेक्षकांचेही मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.       

Tags: chala hawa yeu dyaentertainment newskushal badrikemarathi actorMarathi ComedianMarathi Comedy ShowMarathi Entertainment Newsकुशल बद्रिकेMarathi newsmarathi showचला हवा येऊ द्यामनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी कार्यक्रममराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीमराठी विनोदी अभिनेतामराठी विनोदी कार्यक्रम
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Sukanya Mone On Zee Chitra Gaurav

'बाईपण भारी देवा'च्या अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, सुकन्या मोनेंचा आनंद गगनात मावेना, म्हणाल्या, "श्री स्वामी समर्थ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.