गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सासू-सासऱ्यांची साथ, मुलींना घडवण्यात त्यांचा हात अन्…; अलका कुबल यांना सासरची ओढ, कुटुंबालाच यशाचं श्रेय

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 23, 2025 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Alka kubal talk about her family

सासू-सासऱ्यांची साथ, मुलींना घडवण्यात त्यांचा हात अन्...; अलका कुबल यांना सासरची ओढ, कुटुंबालाच यशाचं श्रेय

आजची स्त्री घर सांभाळत आर्थिक जबाबदारी पार पाडण्यासाठी घराबाहेरही नोकरी करण्यास जाते. पण हे सगळं करत असताना स्त्रीला कुटुंबाचा पाठिंबा मिळणंही तितकंच गरजेचं असतं. कौटुंबिक पाठिंबा असेल तरच गगनभरारी घेणं तिला अधिक सहज शक्य होतं. असंच काहीसं सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांच्याबाबतही घडलं आहे. कलाक्षेत्रात काम करत असताना अलका यांना त्यांच्या कुटुंबियांचा, सासू-सासऱ्यांचा भक्कम पाठिंबा मिळाला. दोन्ही मुली तीन वर्षांच्या होईपर्यंत अलका त्यांना सेटवर घेऊन जायच्या. मात्र दोन्ही मुलींचं पुढचं सगळं संगोपन त्यांच्या सासू-सासऱ्यांनी केलं. याबाबत अलका यांनी अगदी खुलेपणाने भाष्य केलं आहे. (Alka kubal talk about her family)

ITSMAJJA च्या ठाकुर विचारणार या कार्यक्रमात अलका यांना त्यांच्या कुटुंबाबत, मुलींबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्या म्हणाल्या, “माहेरची साडी चित्रपट झाल्यानंतर मी खूप टॉपला होते. वर्षाला १५-१५ चित्रपट करत होते. ११ महिने तर मी शूटसाठी बाहेरच असायचे. कोल्हापूर, सातारा सतत मी तिथेच असायचे. मी प्रेग्नंसीच्या सातव्या महिन्यापर्यंतही काम केलं आहे. मला सगळेच सांभाळायचे. माझी तब्येतही वाढली होती. मग मी पदर सोडून पोट लपवायचे”.

आणखी वाचा – गिरीजा ओकच्या पायाला मोठी दुखापत, रुग्णालयामध्ये उपचार सुरु, उभं राहण्यासाठीही त्रास अन्…

“प्रेग्नंसी झाल्यानंतरही माझ्यासाठी बरेच निर्माते थांबले होते. कारण माझ्या दोन्ही मुलींच्यावेळी त्या तीन महिन्यांच्या झाल्यानंतर काम करायला घेतलं. मला गिरीश ओक नेहमी झाशीची राणी म्हणतो. हिचं बाळ सेटवर असतं कळतंही नाही असं तो म्हणायचा. सेटवर मुलींना घेऊन आल्यावर तेवढ्या वेळात त्यांना दूध पाजायचं, भरवून यायचं हे सगळं करायचे. कारण आई म्हणून मी कुठे कमी पडू नये असं मला वाटायचं. मुली बरोबर आहेत म्हणून मला शॉट द्यायला वेळ होत आहे हे मी कधीच केलं नाही. ९ वाजताच्या शूटला मी मेकअप, ड्रेस सगळं तयार होऊन मी बसायचे. सकाळी पाच वाजता उठून मुलीला उठवायचे, तिला मसाज करायचे, भरवायचे आणि मग तिला सेटवर न्यायचे. दोघीही तीन वर्षांच्या होईपर्यंत मी त्यांना शूटवर न्यायचे. माझ्या दोन्ही मुलींमध्ये पाच वर्षांचं अंतर आहे. तीन वर्षांच्या नंतर त्यांना नर्सरी, शाळा हे सगळं सुरु झालं. पण त्यावेळी मला माझ्या सासू-सासऱ्यांनी खूप पाठिंबा दिला”.

आणखी वाचा – “माझ्याकडे येऊन खूप रडला पण…”, तुषार घाडीगांवकरच्या जवळच्या मित्राने सांगितलं मृत्यूमागील खरं कारण, म्हणाला…

“समीरनेही (पती) मला तितकीच साथ दिली. कारण तोही तेव्हा तितकाच व्यग्र कॅमेरामॅन होता. माझे ३०० पेक्षा अधिक चित्रपट झाले असतील तर समीरचे २५० तरी चित्रपट झाले आहेत. त्यामुळे आम्ही दोघेही तितकेच व्यग्र होतो. समीरही कधी घरी असला तर पालकांचं कर्तव्य अगदी जबाबदारीने पार पाडत होता. माझ्या सासू-सासऱ्यांमुळे कधीही मुलांना पाळणाघरात ठेवण्याची वेळ माझ्यावर आली नाही. बरंच श्रेय मी त्यांनाच देईन. कारण मुलींवर सासू-सासऱ्यांचे संस्कार खूप झाले. मागे वळून बघताना मला असं वाटतं की, मुली ज्या काही घडल्या आहेत त्या सगळ्यामध्ये या संपूर्ण कुटुंबाचा मोठा वाटा आहे”. अलका यांनी त्यांच्या यशाचं, मुलींच्या यशाचं संपूर्ण श्रेय त्यांच्या कुटुंबाला, सासू-सासऱ्यांना दिलं आहे.  

Tags: alka kubalentertainment newsmarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Next Post
sankarshan karhade on condition of theaters

"मराठवाडा दौऱ्यात माझं गांव नाही", परभणीतल्या नाट्यगृहांची दुरावस्था पाहून संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, "इथे प्रयोग होईल अशी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.