सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गिरीजा ओकच्या पायाला मोठी दुखापत, रुग्णालयामध्ये उपचार सुरु, उभं राहण्यासाठीही त्रास अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 23, 2025 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Girija oak in hospital

गिरीजा ओकच्या पाया मोठी दुखापत, रुग्णालयामध्ये उपचार सुरु, उभं राहण्यासाठीही त्रास अन्...

मराठी मालिका, चित्रपट, नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक. गिरीजाने आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलसं केलं. फार मालिका, चित्रपट करत नसतानाही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असते. आताही तिने इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना स्वतःबाबात एक माहिती दिली आहे. सध्या गिरीजा रुग्णालयामध्ये आहे. तिच्या पायाला मोठी दुखापत झाली असल्याचं दिसत आहे. तसेच या कठीण काळात तिचे कुटुंबियही गिरीजाबरोबर तिची साथ देत असल्याचं फोटोंच्या माध्यमातून दाखवलं. (Girija oak in hospital)

गिरीजावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. फोटोंमध्ये तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं असल्याचं दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये ती व्हीलचेअरवर बसलेली दिसत आहे. तसेच पायाची झालेली अवस्था आणि प्लॅस्टर गिरीजा दाखवत आहे. तिला वॉकर घेऊन उभं राहावं लागत आहे. वॉकर घेऊन उभं राहत रुग्णालयाच्या खिडकीबाहेर गिरीजा बघत आहे. असे विविध फोटो व व्हिडीओ तिने शेअर केले आहेत.

आणखी वाचा – १५ वर्षांच्या संसारानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं मोडलं लग्न, नवऱ्यापासून विभक्त राहण्याचा निर्णय, म्हणाली, “एक गोड मुलगा…”

View this post on Instagram

A post shared by Girija Oak Godbole (@girijaoakgodbole)

पायाला फ्रॅक्चर असल्यामुळे रुग्णालयात असल्याचं तिने पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. कोकिलाबेन रुग्णालयामध्ये गिरीजावर उपचार सुरु आहेत. तिने या रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ, नर्स सगळ्यांचे आभारही मानले. तसेच आता गप्प घरी बसायचं असंही गिरीजाने गंमतीशीर अंदाजात म्हटलं आहे. गिरीजाची अशी अवस्था पाहून तिचे चाहते मात्र चिंतेत आहेत. तर तिच्या कलाकार मित्र मंडळींनीही विविध कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, नेमकं काय झालं?

लवकर बरी हो, काय गं काय झालं?, काळजी घे, तुझ्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत. लवकर बरी होऊन घरी ये अशा विविध कमेंट कलाकारांसह चाहत्यांनी केल्या आहेत. तर प्रार्थना बेहरेने म्हटलं की, “कृपया तुझी काळजी घे. सध्या आपण दोघीही एकाच समस्येमधून जात आहोत”. प्रार्थनाच्याही गुडघ्याची सर्जरी झाली आहे. तिही काही दिवस बेडवरच आहे. प्रार्थनानेही फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली होती. तिने गिरीजालाही काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Tags: entertainment newsmarathi actormarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Riteish Deshmukh Bad Behaviour

"हे तुमचे खरे रंग का?", सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला ढकलणं रितेश देशमुखला पडलं महागात, नेटकरी भडकले, म्हणाले, "अनफॉलो…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.