सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आलिया भट्टच्या मनाचा मोठेपणा, ड्रायव्हर आणि घरात काम करणाऱ्या व्यक्तींना लाखो रुपयांची मदत

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 19, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Alia bhatt help her driver and househelper

आलिया भट्टच्या मनाचा मोठेपणा, ड्रायव्हर आणि घरात काम करणाऱ्या व्यक्तींना लाखो रुपयांची मदत

कलाकार मंडळी बऱ्याचदा चित्रीकरणामध्येच अडकून राहतात. तासन् तास शूट करण्यात व्यग्र असतात. अशावेळी घरी व काम सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरतच. कलाकार घरातील काम, त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी मदतनीस कामासाठी ठेवतात. घरात काम करणाऱ्या व्यक्तीलाही तितकेच जपतात. सलमान खान, फराह खान, अर्चना पूरण सिंह, भारती सिंह अशी अनेक मंडळी याचं जिवंत उदाहरण आहेत. भारती तर तिच्या घरात काम करणाऱ्या दोन महिलांना घेऊन व्लॉगही शूट करते. स्वतःच्या कुटुंबियातील व्यक्तींप्रमाणेच वागणूक देते. आता या सगळ्यामध्ये आलिया भट्टचं नावही समोर आलं आहे. (Alia bhatt help her driver and househelper)

आलिया आता लेक राहासह घर आणि काम सांभळत आहे. अगदी कमी वयातच तिने कुटुंबाची जबाबदारीही सांभाळली आहे. यामध्ये तिला पती रणबीर कपूरची व कुटुंबातील इतर सदस्यांची साथ असतेच. पण त्याचबरोबर अलियाला घर सांभाळणं आणखी काही सदस्यांमुळे सहज शक्य होतं. ते म्हणजे तिचे ड्रायव्हर आणि हाऊसहेल्प. सुनिल आणि अमोल आलियासाठी काम करतात. तिचं संपूर्ण घरही सांभाळतात.

आणखी वाचा – राकेश रोशन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु, नक्की काय झालं?, मानेची शस्त्रक्रिया अन्…; आता परिस्थिती कशी?

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

सुनिल आणि अमोलवर आलियाचा मोठा विश्वास आहे. आलिया २०१२ पासून खऱ्या अर्थाने कलाक्षेत्रात कार्यरत झाली. तिथपासून सुनिल आणि अमोलने तिला उत्तम साथ दिली. आलियाला अजूनही ते साथ देत आहेत. म्हणूनच आलियाने त्यांच्यासाठी कौतुकास्पद काम केलं आहे. आलिया तिच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कुटुंब मानते. म्हणूनच सुनिल आणि अमोलला तिने मोठ्या मनाने आर्थिक मदत केली. इतकंच काय तर घर घेण्यासाठीही स्वतःच्या पायावर उभं केलं.

आणखी वाचा – भर पावसात मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेची महाबळेश्वर ट्रिप, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना कुटुंबही दिसले आणि…

स्पॉटबॉय डॉटकॉमच्या वृत्तानुसार, आलियाने २०१९मध्ये ड्रायव्हर आणि हाऊसहेल्पर सुनिल आणि अमोलला ५०-५० लाख रुपये गिफ्ट म्हणून दिले होते. इतकंच काय तर जुहू आणि वांद्रे सारख्या परिसरामध्ये स्वतःच घर घेऊन देण्यासाठी त्यांना आलियाने मदत केली. खरंच तिच्या मनाचा हा मोठेपणा आहे. आलियासाठी हे दोघं कुटुंबच आहेत. म्हणूनच कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती पुढे जावी असं तिला वाटतं. आलियाने केलेल्या या मदतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: alia bhattbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
Pooja Banerjee Kunal Verma

'देवों के देव महादेव'मधील पार्वतीकडे मुलाची फी भरण्यासही पैसे नाहीत, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, वाईट काळ सुरु आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.