mugdha vaishampayan mahabaleshwar trip : ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायिका प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या गायनाने रसिकांच्या मनात घर केलं. रिऍलिटी शोमध्ये दिसलेली ही जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आली तेव्हा साऱ्यांना सुखद धक्का बसला. ही जोडी गेली अनेक वर्ष एकत्र गायनाचे कार्यक्रम करताना दिसली आहे. मुग्धा-प्रथमेशच्या गायनाचे लाखो दिवाने चाहते आहेत. सोशल मीडियावरही मुग्धा बऱ्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळते. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. विशेषतः ही जोडी लग्नानंतर एकत्र फिरताना दिसली आहे, याचे फोटो, व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अशातच आता मुग्धा व प्रथमेश महाबळेश्वर येथे फिरायला गेले आहेत. यावेळी ते दोघेच गेले नसून त्यांचं कुटुंबही त्यांच्याबरोबर आहे. मुग्धाची बहीण मृदुला व तिचे पतीही त्यांच्याबरोबर महाबळेश्वरला फिरायला गेले आहेत. त्यांनी त्यांच्या या एकत्रित फॅमिली ट्रिपचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. मुग्धाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये महाबळेश्वरची सफर पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात हिरव्यागार सौंदर्याने बहरलेलं हे महाबळेश्वर खूपच खास दिसत आहे.
महाबळेश्वर येथे फिरताना मुग्धा-प्रथमेश यांनी विविध चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. पिझ्झा, ब्राऊनी सिझलर, गरमागरम कांदाभजी, महाबळेश्वरचा प्रसिद्ध स्ट्रॉबेरी रोक या सगळ्यांचा आस्वाद घेत चविष्ट पदार्थांची झलक मुग्धाने व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. हिरवागार परिसर, निसर्गरम्य वातावरण यामुळे सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. या व्हिडीओमध्ये मुग्धाची बहिणीबरोबरचे खास बॉण्डिंगही पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनाही मुग्धाची ही फॅमिली ट्रिप आवडली असून अनेकांनी लाईक्सचा वर्षांव केला आहे.
आणखी वाचा – “प्रत्येकजण कुणाकडून तरी दुखावले गेलो”, तेजस्विनी पंडितच्या भावुक पोस्टची चर्चा, म्हणाली, “काही जखमा…”
मुग्धा व प्रथमेश नेहमीच नवनवीन ठिकाण फिरत तिथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसतात. २१ डिसेंबर २०२३ मध्ये मुग्धा व प्रथमेश यांनी शाही थाटामाटात विवाहसोहळा उरकला. कोकणात त्यांनी अगदी पारंपरिक अंदाजात लग्न केले. त्यांच्या लग्नाची सर्वत्र बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.





