मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘देवों के देव महादेव’मधील पार्वतीकडे मुलाची फी भरण्यासही पैसे नाहीत, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, वाईट काळ सुरु आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 20, 2025 | 10:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pooja Banerjee Kunal Verma

'देवों के देव महादेव'मधील पार्वतीकडे मुलाची फी भरण्यासही पैसे नाहीत, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, वाईट काळ सुरु आणि…

Pooja Banerjee Kunal Verma press conference : अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि अभिनेता कुणाल वर्मा ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. मात्र सध्या हे जोडपं वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं पाहायला मिळत आहे. खरं तर, निर्माता श्याम सुंदर डे यांनी अपहरण, फसवणूक आणि पैसे वसूल केल्याचा आरोप करुन त्यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या जोडप्याने नुकतीच एक पत्रकार परिषद घेत या वादांवर स्पष्टपणे भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे. सध्या पूजा व कुणाल यांच्यावर खूप मोठं संकट आलेलं पाहायला मिळत आहे. मात्र हे जोडपे एकमेकांच्या बरोबर खंबीरपणे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे.

नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये ते म्हणाले की, या सर्व गोष्टींमुळे त्यांना द्वेषाचा सामना करावा लागला आहे. इतकेच नव्हे तर त्यांना कामं भेटणेही कठीण झाले आहे. पूजा टेली मसालासह बोलताना म्हणाली की, श्याम सुंदर डेच पैसे घेऊन गायब झाले होते आणि जेव्हा आम्ही त्यांना या पैशांबाबत विचारले तेव्हा उलट त्यांनीच आमच्यावर अपहरण केल्याचा आरोप केला. पूजा म्हणाली की, पोलिस त्यांचे काम करत आहेत आणि आम्ही ठीक आहोत, आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला जाऊ दिले.

आणखी वाचा – वयाच्या ५३व्या वर्षी दाक्षिणात्य अभिनेत्याचे निधन, उपचारासाठी आर्थिक मदतही मागितलेली पण…; किडनी फेल…

कुणाल वर्मा म्हणाला, “मला आफ्रिका, लंडन आणि पाकिस्तान येथून फोन येत आहे आणि आम्हाला साऱ्यांच्या द्वेषाला सामोरे जावे लागत आहे. मी असे म्हणत नाही की माझ्या बाबतीत काहीतरी घडते आहे, मी आणि माझी पत्नी खूप मजबूत आहोत. पण, आम्ही मानसिकदृष्ट्या या त्रासाला सामोरे जात आहोत. कारण जेव्हा पैसे खिशात राहतात तेव्हा आपण बरेच काही सहन करु शकतो. आज, जर माझ्या मुलाने माझ्याकडे काही मागितले तर मी त्याला पैसे देण्यास सक्षम नाही, कारण मला कर्ज द्यावे लागेल. माझ्याकडे मुलाची शाळेची फी भरण्यासाठी पैसे नाहीत. खरं सांगायचं तर, त्याच्या शाळेची फी त्याच्या मामाने भरली आहे”.

आणखी वाचा – भर पावसात मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेची महाबळेश्वर ट्रिप, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना कुटुंबही दिसले आणि…

या कठीण काळात असे बरेच लोक आहेत, ज्यांनी मदतीचा हात पुढे केला. कुणाल पुढे म्हणाला, “आज माझ्याकडे जे काही आहे. सोन्याची अंगठी आहे किंवा जे काही बँकेत होते, कारण मला लोकांना पैसे द्यावे लागतील. माझ्याकडे कोणतेच शूटही नाही. आम्हाला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे”. अभिनेत्याने सांगितले की या वादाचा परिणाम त्याच्या कारकिर्दीवर होत आहे. हे ज्ञात आहे की पूजा बॅनर्जीने बर्‍याच कार्यक्रमांमध्ये काम केले आहे, परंतु ‘देवों के देव महादेव’मध्ये पार्वतीची भूमिका बजावून तिला विशेष लोकप्रियता मिळाली.

Tags: entertainmentPooja Banerjee Kunal Vermatelevision couple
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Next Post
Sambhavna Seth miscarriage

चारवेळा गर्भपात, आयव्हीएफचाही आधार…; वयाच्या ४४ व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, स्वतःच केला खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.