बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राकेश रोशन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु, नक्की काय झालं?, मानेची शस्त्रक्रिया अन्…; आता परिस्थिती कशी?

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 19, 2025 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rakesh roshan health update

राकेश रोशन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु, नक्की काय झालं?, मानेची शस्त्रक्रिया अन्...; आता परिस्थिती कशी?

दिग्दर्शक व अभिनेते राकेश रोशन यांच्या तब्येतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. १६ जुलैला राकेश यांना शारिरीक त्रास जाणवू लागला. तातडीने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. राकेश यांच्या मानेची एंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांचं शारीरिक दुखणं वाढलं होतं. अधिक त्रास जाणवू लागल्यानंतर मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलं. आता त्यांच्या तब्येतीबाबत मुलगी सुनैना रोशनने माहिती दिली आहे. राकेश यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण आता त्यांची नेमकी परिस्थिती काय?, त्यांना नक्की काय त्रास झाला होता? याबबात सुनैनाने सांगितलं आहे. राकेश यांच्या उत्तम आरोग्यासाठी चाहतेही प्रार्थना करत आहेत. (rakesh roshan health update)

राकेश यांच्या मानेची तातडीने एंजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुनैनाने राकेश यांच्या तब्येतीबाबत अमर उजालाशी संवाद साधला. सुनैना म्हणाली, “हो वडिलांच्या मानेची एंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. पण आता ते एकदम ठिक आहेत. आता चिंता करण्यासारखं काहीच नाही. ते आराम करत आहेत. आयसीयुमधून त्यांना जनरल वॉर्डमध्ये आणण्यात आलं आहे”.

आणखी वाचा – वयाच्या ५३व्या वर्षी दाक्षिणात्य अभिनेत्याचे निधन, उपचारासाठी आर्थिक मदतही मागितलेली पण…; किडनी फेल…

View this post on Instagram

A post shared by Rakesh Roshan (@rakesh_roshan9)

राकेश यांना रुग्णालयात अचानक भरती केल्यामुळे विविध चर्चा रंगल्या होत्या. इंडिया फोरमच्या वृत्तानुसार, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्यांची सेवा करत आहे. ऋतिक रोशन तर रुग्णालयात वडिलांसाठी थांबला आहे. त्यांच्याजवळ राहून वडिलांना आजारपणात साथ देण्याचं त्याने ठरवलं आहे. तसेच ऋतिकची गर्लफ्रेंड सबा अजाजही राकेश यांना भेटण्यासाठी गेली होती. संपूर्ण कुटुंबच राकेश यांच्या जोडीला आहे. पण आता शारीरिकदृष्ट्या ते अधिक उत्तम आहेत.

आणखी वाचा – भर पावसात मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेची महाबळेश्वर ट्रिप, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना कुटुंबही दिसले आणि…

ऋतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुजैन खानने या संपूर्ण प्रकरणाबाबत काहीही बोलणं टाळलं आहे. कौटुंबिक मुद्द्यांवर काहीच बोलणार नसल्याचं सुजैनने सांगितलं आहे. राकेश मध्यंतरीच्या काही दिवसांमध्ये क्रिश ४ चित्रपटामुळे चर्चेत होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन ते करणार होते. मात्र त्यांनी स्वतःचा निर्णय बदलला. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी ऋतिककडे दिली. ऋतिक दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Tags: bollywood newsentertainment newsrakesh roshan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Alia bhatt help her driver and househelper

आलिया भट्टच्या मनाचा मोठेपणा, ड्रायव्हर आणि घरात काम करणाऱ्या व्यक्तींना लाखो रुपयांची मदत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.