Bigg Boss Season 17 Grand Finale Updates : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा काल (२८ जानेवारी) रोजी पार पडला. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७वया पर्वात प्रसिद्ध कॉमेडियन व अभिनेता मुनव्वर फारुकीने विजेतेपद पटकावले. ‘बिग बॉस’च्या घरात येण्यापूर्वी मुनव्वरची लोकप्रियता ही खूपच होती. पण ‘बिग बॉस’च्या प्रवेशानंतर त्याच्या लोकप्रियतेत आणखीनच वाढ झाली. या शोमध्ये तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चांगलाच चर्चेत आला. या घरात वाईल्ड कार्ड म्हणून आलेली स्पर्धक आयेशा खानने मुनव्वरवर अनेक गंभीर आरोप केले होते.
अशातच ‘बिग बॉस १७’चा विजेता झाल्यानंतर मुनव्वरने आयेशाबद्दल भाष्य केलं आहे. ‘इन्स्टंट बॉलिवूड ’ला दिलेल्या मुलाखतीत मुनव्वरला “शो संपल्यानंतर तो आयशाच्या संपर्कात राहिल का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मुनव्वर उत्तर देत असं म्हणाला की, “मी तिच्या संपर्कात राहीन असं मला वाटत नाही. मी खूप गोष्टी सोडून देतो, पण कधी कधी काही गोष्टी योग्य रितीने संपवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्याच गोष्टी मी ‘बिग बॉस’च्या प्रवासातून शिकलो आहे.”
यापुढे त्याने असं म्हटलं की, “मी आता माझ्या नात्यांमध्ये जास्त स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आयुष्यात त्याच लोकांना महत्त्व द्या, ज्यांच्या आयुष्यात तुम्हाला महत्त्व आहे, हेच मी शिकलो आहे आणि त्यावर मी माझ्या पुढील आयुष्यात काम करेन.”
आणखी वाचा – मुग्धा करतेय प्रथमेशचे लाड, नवऱ्याच्या उपवासादिवशी बनवला खास पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाला, “बायको…”
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात येताच क्षणी आयेशाने मुन्नवरवर अनेक गंभीर आरोप केले होते. मुनव्वर दुसऱ्या मुलीबरोबर नात्यात होता, पण तरीही त्याने आपली फसवणूक केली असं यावेळी तिने म्हटलं होतं. मुनव्वरने वारंवार खोटं बोललं असून त्याने खूप मुलींची फसवणूक केली आहे, असा गंभीर आरोपही तिने केला होता. यांमुळे मुनव्वर हा घरात एकाकी पडला असून रडतानाचेही पाहायला मिळाले. तसेच त्याने अनेकदा आयेशाची माफीदेखील मागितली होती.