सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला प्रसाद खांडेकरने दिली बर्थडे पार्टी, सेटवरच लावला पाणीपुरीचा स्टॉल, खायला गर्दी अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 6, 2024 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Khandekar Birthday Party

Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमला प्रसाद खांडेकरने दिली बर्थडे पार्टी, सेटवरच लावला पाणीपुरीचा स्टॉल, खायला गर्दी अन्…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमांने आजवर प्रेक्षकांना अक्षरशः वेड करुन सोडलं आहे. या कार्यक्रमाचे लाखो दिवाने चाहते आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जगभरात या कार्यक्रमाची क्रेझ असलेली पाहायला मिळते. या कार्यक्रमातून प्रसिद्धीस आलेल्या सर्वच कलाकारांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशातच या कार्यक्रमातील अभिनेता प्रसाद खांडेकर यांने आजवर त्याच्या विनोदी अंगशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रसाद नेहमीच त्याच्या अभिनयाबरोबरच लेखनातूनही व दिग्दर्शनातूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. (Prasad Khandekar Birthday Party)

अशातच प्रसादचा नुकताच वाढदिवस झाला. यावेळी हास्यजत्रेतील सर्वच कलाकार मंडळींनी त्याला हटके शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. दरम्यान प्रसादने हास्यजत्रेतील मंडळींना वाढदिवसाची पार्टी म्हणून पाणीपुरीचा बेत ठेवलेला पाहायला मिळाला. कलाकारांनी सोशल मीडियावरुन पाणीपुरी एन्जॉय करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. सेटवर असल्याने पाणीपुरी खाता येईल अशी व्यवस्था केली होती. दरम्यान सगळीच कलाकार मंडळी अगदी गोंधळ घालत या प्रसाद दादाच्या पार्टीचा आनंद घेताना दिसली.

आणखी वाचा – राहा कपूर काका अयान मुखर्जीबरोबर फिरताना दिसली अन्…; रणबीर-आलियाच्या मुलीचे Cute Expression पाहून व्हाल थक्क, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

“दादाच्या पार्टीचा बर्थडे आहे”, असं कॅप्शन देत पृथ्वीक प्रतापने प्रसादला हटके शुभेच्छा देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ओंकार राऊत, शिवाली परब, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, इशा डे, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने, विराज जगताप, निखिल बने, प्रियदर्शिनी इंदलकर, निखिल बने, चेतना भट ही कलाकार मंडळी प्रसादच्या वाढदिवसाच्या पार्टीत एन्जॉय करताना दिसली. एकूणच सगळी मंडळी या पाणीपुरीवर तुटून पडलेली दिसली.

आणखी वाचा – आदित्यमुळे पारूची वैजू भेटली, दामिनीचा डाव तिच्यावरच उलटला अन्…; अहिल्यादेवींसमोर येणार का वैजूचं सत्य?

प्रसादला सिनेसृष्टीतून अनेक कलाकार मंडळींनी शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. “पश्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वेडेपणाचा भार. हसत हसत जगात आनंद पसरव. (चला एक पोस्ट एक रील, एक कथा, पुरे झालं.आता भेटवस्तू मागू नको), असं म्हणत नम्रताने प्रसादला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय अनेकांनी गमतीशीर कॅप्शन देत प्रसादला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत.

Tags: entertainmentmaharashtrachi hasyajatramhj teamprasad khandekarPrasad Khandekar Birthday Party
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi zee marathi serial update new twist

रुपालीमुळे कुटुंबातील आणखी एका सदस्याचा बळी?, देवी आईच्या लेकी राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवू शकतील का? ‘सातव्या मुलीची...’मध्ये नवा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.