शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

परदेशात प्रसाद ओकचा लेक पदवीधर झाल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव, मराठी कलाकारही भारावले, म्हणाले, “आम्हाला तुझा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 20, 2023 | 1:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi Celebrity On Prasad Oak Son

परदेशात प्रसाद ओकचा लेक पदवीधर झाल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव, मराठी कलाकारही भारावले, म्हणाले, "आम्हाला तुझा…"

उत्तम अभिनेता, दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक नेहमीच विशेष कारणामुळे चर्चेत असतो. अभिनयाबरोबरचं प्रसाद त्याच्या पत्नीबरोबरच्या रिल व्हिडीओमुळे चर्चेत असतो. सध्या प्रसाद त्याच्या कुटुंबासह परदेशवारी करण्यात व्यस्त आहे. प्रदेशात जातानाचे अनेक फोटो प्रसाद व मंजिरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. सध्या प्रसाद त्याच्या कुटुंबियांसह जर्मनी येथे गेला आहे. (Marathi Celebrity On Prasad Oak Son)

जर्मनी येथे केवळ फिरण्यासाठी नव्हे तर ओक कुटुंबाचं नाव मोठं करणाऱ्या एका सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती. प्रसादचा एक मुलगा सार्थक शिक्षणानिमित्त परदेशात असून नुकताच त्याचा पदवी प्रदान सोहळा पार पडला. यावेळी प्रसादसह पत्नी मंजिरी आणि लेक मयांकदेखील उपस्थित होते. सार्थकने ‘बीए इन इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट’ यामध्ये पदवी मिळवली असून हा अभिमानाचा क्षण प्रसाद व मंजिरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “आपल्यात कोणतंच नातं उरलं नाही आणि…”, अंकिता लोखंडेचं नवऱ्याला थेट उत्तर, म्हणाली, “तू माझ्यापासून…”

ओक कुटुंबियांच्या या आनंदाच्या सोहळ्यात अनेक कलाकार मंडळीही सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. सार्थकला मिळालेल्या पदवीप्रदान सोहळ्यानंतर प्रसाद व मंजिरी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी सार्थकला शुभेच्छा देत म्हटलं आहे की, “मनःपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,सार्थक”. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने कमेंट करत म्हटलं आहे की, “खूप चांगली प्रगती केली आहेस. आम्हाला तुझा अभिमान आहे”. याशिवाय सुबोध भावे, अमृता खानविलकर, सचित पाटील, अभिजित खांडकेकर, श्रेया बुगडे , जितेंद्र जोशी, मंजिरी भावे यांसारख्या अनेक कलाकारांनी सार्थक व त्याच्या पालकांचे म्हणजेचं प्रसाद-मंजिरीचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

आणखी वाचा – “मी छान तयार झाले…”, नणंदबाईंची इच्छा पूर्ण करत अमृता देशमुखने नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा, म्हणाली, “होपफुली प्रसाद…”

प्रसादने लेकासाठी खास पोस्ट शेअर करत म्हटलं, “सार्थक. आम्हा सगळ्यांपासून खूप लांब राहून शिक्षण घ्यायचा निर्णय तू अत्यंत धाडसाने घेतलास. खूप कष्ट केलेस, अभ्यास केलास! आज हे क्षण पाहताना तुझ्या निर्णयाचं आणि कष्टांचं चीज झालं, असं मनापासून वाटतंय. तुझ्या पुढच्या प्रवासाला अगणित शुभेच्छा!”. तर मंजिरीने तिच्या पोस्टला “कमाल क्षण , कमाल अनुभव, कमाल भावना. आयुष्याचं सार्थक झालं!”. प्रसादची लेकासाठीची ही पोस्ट चर्चेत आली असून कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनाही सार्थकला शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: entertainmentmanjiri oakmarathi actorMarathi Celebrity On Prasad Oak Sonprasad oakprasad oak son
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar shared her new haircut look photo on instagram

साडीमध्ये दिसणारी 'आई कुठे काय करते'मधील मधुराणी प्रभुलकरने ड्रेसिंग स्टाइलसह संपूर्ण लूकच बदलला, सुकन्या मोने म्हणतात, "तू खूप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.