बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साडीमध्ये दिसणारी ‘आई कुठे काय करते’मधील मधुराणी प्रभुलकरने ड्रेसिंग स्टाइलसह संपूर्ण लूकच बदलला, सुकन्या मोने म्हणतात, “तू खूप…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 20, 2023 | 2:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar shared her new haircut look photo on instagram

साडीमध्ये दिसणारी 'आई कुठे काय करते'मधील मधुराणी प्रभुलकरने ड्रेसिंग स्टाइलसह संपूर्ण लूकच बदलला, सुकन्या मोने म्हणतात, "तू खूप..."

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका गेली काही वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या आवडीची आहेत. त्यात अरुंधती हे पात्र तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं. मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. अशातच आता तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. मधुराणीने तिचा संपूर्ण लूकच बदलला आहे. (Actress Madhurani Prabhulkar Shared Her New Haircut Photo On Instagram)

मधुराणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेला हा फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये तिचा नवीन हेअर कटमधील सुंदर लूक पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘न्यू हेअर कट’ असं कॅप्शन दिलं आहे आणि त्याखाली ‘स्माईल तो बनता है” असंदेखील म्हटलं आहे. दरम्यान तिच्या या लूकवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Madhurani Gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar)

आणखी वाचा – लोहगडावर पोहोचले ‘आई कुठे काय करते?’ फेम मिलींद गवळी, फोटो पोस्ट करत म्हणाले, “माझा कुत्राही गड चढला अन्…”

मालिकेत अरुंधतीचा लूक हा अतिशय साधा आहे. साधी सहावारी साडी आणि त्यावर साधीच वेणी असा सिंपल लूक मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतो. अर्थात हा लूकदेखील चाहत्यांना आवडतोच. पण आपल्या आवडत्या कलाकाराने एखादी नवीन गोष्ट केली तर तीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडते.

आणखी वाचा – परदेशात प्रसाद ओकचा लेक पदवीधर झाल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव, मराठी कलाकारही भारावले, म्हणाले, “आम्हाला तुझा…”

मधुराणीचा हा लूक चाहत्यांसह गायक-संगीतकार सलील कुलकर्णी व अभिनेत्री सुकन्या मोने या कलाकारांनादेखील आवडला असल्याचे पाहायला मिळत आहे. सुकन्या यांनी या फोटोवर “खूप गोड दिसत आहेस” असं म्हणत तिचे कौतुकदेखील केले आहे. तर नेटकऱ्यांनीही “गोड, खूपच सुंदर, “छान दिसतेस मधुराणी, ‘आई कुठे काय करते’मध्ये पण हाच लूक दाखवला पाहिजे” अशा कमेंट्स करत तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

Tags: aai kuthe kay karteentertainment newsmadhurani prabhulkarmarathi actressmarathi entertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Harbhajan singh remark on anushka sharma athiya Shetty

IND vs AUS सामन्यादरम्यान अनुष्का शर्मा व अथिया शेट्टीची हरभजन सिंगने उडवली खिल्ली, चाहतेही भडकले, म्हणाला, "यांना क्रिकेटबद्दल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.