शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी छान तयार झाले…”, नणंदबाईंची इच्छा पूर्ण करत अमृता देशमुखने नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा, म्हणाली, “होपफुली प्रसाद…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 20, 2023 | 12:25 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage

"मी छान तयार झाले…", नणंदबाईंची इच्छा पूर्ण करत अमृता देशमुखने नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा, म्हणाली, "होपफुली प्रसाद…"

Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. शनिवार (१८ नोव्हेंबर) रोजी प्रसाद-अमृता बोहोल्यावर चढले आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. प्रसाद- अमृताच्या शाही विवाहसमारंभाला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी हजेरी लावत त्यांच्या लग्नसोहळ्याला चारचाँद लावले आहेत. या जोडीने त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींपासूनचं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

लग्नानंतर प्रसाद-अमृताच्या लूकची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. सांगीतिक पद्धतीने पत्रिकेद्वारे त्यांनी त्यांच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. तळेगाव, पुणे येथील एका फार्महाऊसवर त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत प्रसाद-अमृता यांनी एकमेकांना वरमाला घालत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याहून अधिक चर्चा रंगली ती त्यांच्या हळदी समारंभाची.

आणखी वाचा – “भोळ्या चेहऱ्यामागचा सैतान…”, समीर परांजपेच्या वाढदिवसानिमित्त अक्षया नाईकची खास पोस्ट, म्हणाली, “तू मला जितका त्रास…”

प्रसाद व अमृताच्या हळदी समारंभाचे अनेक फोटोस सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हळद लागल्यानंतर प्रसाद-अमृताचं रूप खुलून आलेलं पाहायला मिळालं. हळदीनंतर दोघेही थिरकताना ही दिसले आहेत. पिवळ्या रंगाचा लेहंगा आणि फुलांचे घातलेले दागिने यांत अमृता खूप सुंदर दिसत आहे तर प्रसादनेही पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. अनेक कलाकार मंडळींनी प्रसाद-अमृताच्या हळदी समारंभालाही हजेरी लावली होती.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव हिने भावाच्या म्हणजेच प्रसाद जवादेच्या लग्नाला सहकुटुंब हजेरी लावली. त्यांच्या हळदी समारंभालाही नम्रता हजर होती. नम्रताने तिच्या होणाऱ्या वहिनीला हळदी स्पेशल उखाणा घ्यायला लावला, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यावेळी लाजत लाजत अमृतानेही उखाणा घेत नणंदबाईंची इच्छा पूर्ण केली.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे व विकी जैनला मिळत आहे स्पेशल ट्रीटमेंट, इतर स्पर्धकांना राग अनावर, म्हणाले, “त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये…”

अमृताने हळदीस्पेशल असा अगदी हटके अंदाजात उखाणा घेतला. अमृता उखाणा घेत म्हणाली, “आहे प्रसाद-अमृताची हळद, घातलंय सगळ्यांनी येलो, आता एवढी मी छान तयार झाले, होपफुली प्रसाद म्हणेल हाय मी मेलो”. अमृताच्या या हटके उखाण्याने नम्रता खुश झालेली पाहायला मिळाली. सध्या सिनेसृष्टीत अमृता-प्रसाद या नवविवाहित जोडप्याची व त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळतेय.

Tags: amruta deshmukhamruta deshmukh and prasad jawade weddingamruta special ukhanacelebrity coupleentertainmentprasad jawade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
ankita lokhande told vicky jain no any relation with me and you in bigg boss 17 viedo viral

Bigg Boss 17 : “आपल्यात कोणतंच नातं उरलं नाही आणि…”, अंकिता लोखंडेचं नवऱ्याला थेट उत्तर, म्हणाली, “तू माझ्यापासून…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.