छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. ‘बिग बॉस १७’च्या विजेते पदावर मुनव्वर फारुकीने आपले नाव कोरले. बिग बॉसच्या घरात असताना प्रत्येक स्पर्धकाची चांगलीच चर्चा झाली असल्याचे पाहायला मिळाले. पण आता हा शो संपला असला तरी या शोमधील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेत आहेत. शोमध्ये मुनव्वर व मनारा यांच्या नात्यात अनेक चढ-उतार होते. दोघांमध्ये कधी मैत्री तर कधी शत्रुत्व पाहायला मिळाले. शोमध्ये मुनव्वरने अंकिता लोखंडेला मन्नाराने त्याचे चुंबन घेतल्याचे सांगितले होते. यावर स्वत: मनाराने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
मनारा चोप्राने ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मुनव्वर फारुकीला तिला खास मित्र व कुटुंबातील एक सदस्य असल्याचे म्हटले. यापुढे ती असं म्हणाली की, “मुनव्वर हा माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. मी त्याला माझा खरा मित्र मानते. या शोमध्ये त्याने मला खूप मदत केली. शोमध्ये टास्कदरम्यान आमच्यात भांडणे, वाद झाले पण त्यानंतर आम्ही चांगले मित्र म्हणूनच वागलो. शोमध्ये मी सर्वांशी अगदी मनापासून मैत्री केली.”
तसेच या मुलाखतीत मनाराला मुनव्वरने केलेल्या कीसबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिला हा प्रश्न ऐकून धक्काच बसला. हा प्रश्न ऐकताच ती असं म्हणाली की, “अरे देवा! हे एक अतिशय विचित्र विधान आहे. असं काहीच झालं नाही. असे कोणतेच फुटेजही नाही. मुनव्वरने हे विधान कशासंदर्भात केलं आहे, ते मला माहीत नाही. पण त्याने असे म्हटले असेल तर त्याने माझी जाहीर माफी मागावी.”
दरम्यान, ‘बिग बॉस १७’च्या महाअंतिम सोहळ्याच्या काही दिवस आधी मुनव्वरने अंकिता लोखंडेबरोबर ही विधान केले होते. यावेळी मनाराने त्याला (मुनव्वर)ला कीस केले असल्याचे अंकिताला सांगितले होते. अशातच मनाराने ही गोष्ट खोटे असल्याचे म्हटले आहे.